IPS देवेन भारती यांच्या जागी ‘या’ IPS अधिकार्‍याची नियुक्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुक आयोगाने केलेल्या सुचनेनुसार बृम्हमुंबई पोलिस आयुक्‍तालयात सह पोलिस आयुक्‍त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांची बृम्हमुंबई आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्‍ती करण्यात आली असुन त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे सह आयुक्‍त असलेले व्ही.के. चौबे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री निवडणुक आयोगाने देवेन भारती यांची तात्काळ बदली करा अशा सुचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर रविवारी दुपारी देवेन भारती यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला आहे. देवेन भारती यांची बदली झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. यापुर्वी त्यांची बदली होणार होती मात्र राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची बदली लांबणीवर टाकली होती. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने निवडणुक आयोगाला पाठविला होता. त्यावेळी निवडणुक आयोगाने त्यावेळी तो प्रस्ताव मान्य देखील केला होता. मात्र, शनिवारी निवडणुक आयोगाने सह पोलिस आयुक्‍त देवेन भारती यांची तात्काळ बदली करण्याची सुचना केली. त्यानंतर काही तासातच देवेन भारती यांची सह आयुक्‍त (कायदा व सुव्यवस्था) पदावरून आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

व्ही.के. चौबे हे सन 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असुन त्यांनी यापुर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणुन काम पाहिले आहे.

You might also like