विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात केली व्हिडिओ रेकॉर्डिंग, पोलिसांनी नोंदविला हेरगिरीचा FIR

मुंबई : मुंबईच्या वडाळामध्ये एलएलबीच्या सेकंड ईयरच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी मास्क न घातल्याने अटक केले. नंतर त्या विद्यार्थ्याविरोधात ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्टअंतर्गत ’हेरगिरी’ची केस दाखल केली आहे. विद्यार्थ्यावर आरोप आहे की, त्याने आपल्या मोबाईल फोनद्वारे पोलीस ठाण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या केसमध्ये तक्रारदार काँस्टेबल शांताराम खाडे आहेत. खाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, वडाळा ब्रिजवर पोलिसांनी ट्रॅफिक चेकिंगसाठी बॅरिकेड लावले होते. 17 सप्टेंबरच्या या चेकिंगमध्ये मास्क न घालता गाडी चालवणार्‍यांवर लक्ष ठेवण्यात येत होते. याच दिवशी सायंकाळी मुकेश सिंह (31) ला चेकिंगसाठी थांबवण्यात आले. मुकेशसोबत मनोज शुक्ला (30) सुद्धा मोटरसायकलवर मागे बसला होता. दोघांनी फेस मास्क घातला नव्हता. मुकेश सिंह ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवत होता.

पोलिसांनी आरोपात म्हटले आहे की, चेकिंगच्या दरम्यान, नाकाबंदीवर मुकेश सिंहने पोलीस कर्मचार्‍यांसोबत अगाऊपणा केला. मुकेश सिंहला लॉकडाऊनचे नियम तोडण्याच्या आरोपाखाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुकेश सिंहने आपल्या मोबाईलमधून स्टेशन हाऊस आणि पोलीस कर्मचार्‍यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. वडाळा पोलीस ठाण्याचे सीनियर इन्स्पेक्टर शहाजी शिंदे यांनी मुकेशला व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना पकडले. यानंतर त्याचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला आणि त्याच्याविरोधात एफआयआरमध्ये ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्टचे एक कलम लावण्यात आले.