शेवटी का मिळाला नाही शिवसेनेला कॉंग्रेसचा ‘पाठिंबा’, एका फोन कॉलमुळे कसं बदलल ‘वातावरण’ ?…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा कि नाही यावर दिवसभर काँग्रेसच्या गोटात खलबते सुरु होती. त्यानंतर आता आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.

मात्र शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना फोन करून शिवसेनेकडून आपल्याला पाठिंब्याबाबत कोणतीही विचारणा झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोनिया गांधी यांनी देखील आपला निर्णय राखून ठेवला असून आज काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सहा वाजता सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना फोन केला होता. त्यावेळी जवळपास 15 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी शरद पवार यांनी सोनिया यांना थोडे थांबण्याचा सल्ला दिला. तसेच आज शिवसेनेशी ते चर्चा करणार असून त्यांनी काँग्रेस नेत्यांना मुंबईत चर्चेसाठी पाठवण्याचे देखील सोनिया गांधी यांना सांगितले.

या उत्तराची अपेक्षा नव्हती
सोनिया गांधी यांना शरद पवार यांच्याकडून या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्यांनी चर्चा झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे ठरवले असून आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.

अँटनी- खर्गे यांना शिवसेनेसोबत सत्ता नको
महाराष्ट्रातील नेते हे शिवसेनेबरोबर जाण्यास उत्सुक असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देखील काही आपत्ती नाही. मात्र मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल हे शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यास उत्सुक नाही. त्याचबरोबर एके एंटनी देखील उत्सुक नसून आज काय निर्णय होणार हे महत्वाचे आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like