Mumbai News : डोंबिवलीच्या ‘या’ तरूणीने दरोडेखोरांना घडवली अद्दल, वडीलांचाही जीव वाचवला, सर्वत्र होतेय ‘कौतूक’

मुंबई : मुंबईत (Mumbai)  एका तरूणीने धाडस दाखवत घरात घुसलेल्या दरोडेखोरांना कायमची अद्दल घडवली, शिवाय आपल्या वडीलांना सुरक्षित ठेवले. मुंबईच्या (Mumbai)  डोंबिवली परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले की, एका शेजार्‍यानेच लूटमारीचा हा कट रचला होता.

61 वर्षांचे अशोक गोरी रिटायर्ड बँक कर्मचारी आहेत. शुक्रवारी जेव्हा ते घरी एकटेच होते, तेव्हा तीन दरोडेखोर घरात शिरले. दरोडेखोर घराच्या आत असतानाच त्यांची 20 वर्षांची मुलगी प्रतीक्षा घरी पोहचली. प्रतीक्षाने पाहिले की, तिच्या वडिलांचे हातापाय बांधलेले होते आणि चेहरा झाकलेला होता. प्रतीक्षाला अचानक पाहून दरोडेखोर सावध झाले.

त्यांनी प्रतीक्षावर सुद्धा हल्ला करून तिला बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतीक्षाने धाडस दाखवत ओरडण्यास सुरूवात केली. एवढेच नाही तर दरोडेखोर पळून जात असताना प्रतीक्षाने एकाचा मोबाइल सुद्धा हिसकावून घेतला. या मोबाइलचा रेकॉर्ड आणि बिल्डिंगच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने डोंबिवलीच्या विष्णु नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला. तिघांना 24 तासाच्या आत अटक करण्यात आली. आरोपींची नावे चेतन मकवाना, अब्दुल शेख आणि चंद्रिका अशी आहेत.

पोलीस तपासात हैराण करणारा एँगल समोर आला आहे की, लूटमार करण्याचा हा कट गोरी यांच्या फ्लॅटच्या एक फ्लोअर वर राहणार्‍या शेजार्‍यानेच रचला होता. त्यांचा शेजारी दिनेश रावल यास सुद्धा अटक केली आहे. पोलिसांनुसार, गोरी यांच्या घरातून किंमती वस्तूंची लूट करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. गोरी हे घराचा दरवाजा नेहमी उघडा ठेवत असत कारण त्यांना उभे राहून दरवाजा उघडण्यास त्रास होत होता.

यामुळे गोरी यांच्या घरावर रावल नजर ठेवू लागला की, केव्हा त्यांची पत्नी आणि मुलगी घराच्या बाहेर जातात. शुक्रवारी दोघी घराच्या बाहेर गेल्या तेव्हा रावलने दरोडेखोरांना गोरी घरी एकटे असल्याचे सांगितले. परंतु, दरोडेखोर घरातच असतानाच प्रतीक्षा तिथे पोहचली आणि तिने धाडसाने त्यांना तोंड देत आरडा-ओरड केली. तिच्या या धाडसाचे कौतूक होत आहे.