Mumbai : अंधेरी परिसरात किरकोळ कारणावरून महिलेने केली 4 वर्षीय चिमुरड्याची हत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरीच्या सहार परिसरात राहणार्‍या महिलेने किरकोळ कारणावरून एका चार वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. या घटनेने मात्र मुंबईकर हादरुन गेले आहेत. मधू गाधे असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा मृत मुलाच्या आई-वडिलांशी वाद होता. हा वाद इतका टोकला गेली की, आरोपी महिलेने बदला घेण्यासाठी त्यांच्या चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करण्याचा कट रचला. आरोपी महिलेने सोमवारी या चिमुरड्याला घरी बोलवून घेतले. त्यानंतर तिने कपड्याच्या सहाय्याने चिमुरड्याचा गळा आवळला. ती एवढ्यावरच थांबली नाही तर बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बादलीत त्याला बुडविले.

दरम्यान, आपला मुलगा दिसत नसल्याने आई-वडिलांनी शेजारील घरांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला असता आरोपी मधू गाधेने त्यांना घरात येऊ दिले नाही, त्याचवेळी संशय आला. जबरदस्तीने पालकांनी घरात प्रवेश केला तेव्हा बाथरुममध्ये मुलाचा मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला.