जमीन खरेदीसाठी कोकणात गेलेल्या मुंबईतील महिलेचा खून

रत्नागिरी : पोलीसनामा आॅनलाईन

जमीन खरेदीच्या व्यावहारासाठी मुंबईतून कोकणात गेलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात ही घटना घडली. स्मिता कुसूरकर असं मृत महिलेचं नाव आहे. सदर प्रकरणी श्रीकांत घडशी या इसमाला अटक केली आहे.
[amazon_link asins=’B01MY1EGZE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ede1902-94be-11e8-8532-9762f8572607′]
मृत महिला ही मुंबईतील  एका खासगी कंपनीतून निवृत्त झाली होती. त्या जमीनीच्या व्यावहारासाठी संगमेश्वरमध्ये गेल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांचा काहीच तपास न लागल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर स्मिता कुसूरकर यांचा मृतदेह संगमेश्वरजवळ असणाऱ्या चिरेखाणीत आढळला. स्मिता यांच्या शेवटच्या संभाषणावरुन मुंबईत राहणाऱ्या श्रीकांत घडशी या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, स्मिता यांची हत्या केल्याचे कबुल केले.

प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.