धक्कदायक ! शिक्षकाच्या प्रश्नाला उत्तर न दिल्यानं आईनं मुलीला पेन्सिलनं भोसकलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या कोरोनाचा ( Corona) प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे गेली ५ महिने शाळा 9 School) बंद आहे पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिकवणी 9 Online Class) चालू करण्यात आली आहे. पण या शिकवणी दरम्यान मुंबई मध्ये एक अशी घटना समोर आली आहे त्यामध्ये एका आईने आपल्या मुलीवर पेन्सिलनं वार केले आहेत. ऑनलाईन वर्ग सुरू असताना शिक्षकानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही म्हणून आईनं रंगाच्या भारत सहावीत शिकणाऱ्या मुलीवर वार करून तिला जखमी केले आहे. त्या महिलेविरुद्ध गुन्हा ( Crime) दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका प्रकार
बुधवारी या मुलीचा ऑनलाईन वर्ग सुरु होता. तेव्हा शिक्षकांनी त्या मुलीला प्रश्न विचारला तेव्हा त्या मुलीला त्याचे उत्तर देता नाही आले. त्यामुळे तिच्या आईला त्याचा राग अनावर झाला. आणि त्या रागाच्या भारत आईनं मुलीच्या पाठीत पेन्सिल भोसकलं. त्यानंतर तिच्यावर पेन्सिलने अनेक वार केले. हा सगळा प्रकार जखमी मुलीच्या मोठ्या बहिणीनं बघितला आणि तिने लगेच चाईल्ड हेल्पलाईनला ( Child Helpline) फोन करून या घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्वयंसेवी संस्थेचे दोन कार्यकर्ते मुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी नेमका काय प्रकार घडला ते समजून घेतला. त्यावर त्या महिलेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सदर महिलेवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.शासनाने ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ अशी मोहीम राबवली असली तरी आता प्रत्यक्षात घरोघरी ‘शाळा बंद, समस्या सुरू’ अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून घरी अडकलेल्या मुलांना मिळणारे उपक्रम, शिक्षण, शिबिरे यांचे ऑनलाइन पर्याय अपुरे पडू लागले आहेत. लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, भीती या समस्या ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे निरीक्षण समुपदेशक, बालरोगतज्ज्ञांकडून नोंदवण्यात आले आहे.