डॉल्बीवाल्यांचा डीजे वाजणार नाही….!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम असून आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे आणि डॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्यच आहे, अशी भूमिका राज्य सरकारने हायकोर्टात मांडली. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून हायकोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही गणपती विसर्जनात कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारचं अशी भूमिका घेतली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40020142-bbe8-11e8-b1a1-a5a6cb3429c0′]

गणपती विसर्जन मिरवणुकीसारख्या कार्यक्रमात पोलीस केवळ कारवाई करू शकतात, त्यांना रोखू शकत नाहीत, असंही राज्य सरकार न्यायालयात सांगितलं. गणेशोत्सवातील गोंगाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारली आहे. याविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड आणि लाइटनिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान हायकोर्टात सांगितले की, पोलिसांनी डॉल्बी व डीजेला परवानगी नाकारण्यापूर्वी कोणताही अभ्यास केला नाही. यापूर्वी पोलिसांनी आवाजाची मर्यादा ओलांडणारे फटाके वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत का?. लाइव्ह कॉन्सर्ट आणि इनडोअर कार्यक्रमांमध्ये डीजे व डॉल्बीला परवानगी दिली जाते. मग सार्वजनिक ठिकाणीच बंदी का, असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विचारला.

पास करण्यासाठी विध्यार्थीनीकडे केली शरीरसुखाची मागणी

गेल्या वर्षभरात ध्वनी प्रदुषणासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांत ७५ टक्के प्रकरण डीजेची असल्याची माहितीही सरकारने न्यायालयात दिली. तर राज्य सरकारने डीजेला परवानगी देण्याचा कडाडून विरोध केला. ध्वनी प्रदुषणाची पातळी ओलांडणा-या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्य आहे, असे राज्य सरकारने सांगितले. युक्तिवादादरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी डीजे आवाजाची मर्यादा ओलांडणार नाही, असे सांगितले. यावर हायकोर्टाने सांगितले की, हायकोर्टात दावा केला जातो. पण प्रत्यक्षात याचे पालन होत नाही हे सर्वांनाच माहित आहे. गेल्या वर्षभरात ध्वनी प्रदुषणासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांत ७५ टक्के प्रकरण डीजेची असल्याची माहितीही सरकारने न्यायालयात दिली. हायकोर्टाने तूर्तास डीजे आणि डॉल्बीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.

मोबाईल नंबर एकाचा, कुटुंब भलत्याचे; पंतप्रधानांच्या आयुष्यमान योजनेचा सावळा गोंधळ

दोन दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. “डीजे बंदीचं प्रकरण कोर्टात असल्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, मात्र मंडळ जर तयार असतील. तर डीजे वाजवा”, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं डीजे मालकांनी सांगितलं होतं.