मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बनले महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन, मिळाला ‘गोल्ड’ अवॉर्ड

मुंबई : मुंबईचे मोठे आणि प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी स्टेशनला महाराष्ट्रातील पहिले ग्रीन स्टेशन म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे. ग्रीन स्टेशनचे हे सर्टिफिकेट भारतीय उद्योग संघाच्या आयजीबीसी म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून देण्यात आले आहे. ग्रीन स्टेशनसह सीएसएमटी स्टेशन गोल्ड अवॉर्डने सन्मानित होणारे पहिले स्टेशन आहे. या स्टेशनला हे अवॉर्ड हरित क्षेत्र बनवणे, सौर पॅनल लावणे, एलईडी बल्ब, अपंग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी कम्प्युटर फ्रेंडली बनवण्यासारख्या अनेक वैशिष्ट्यांसाठी मिळाले आहे.

मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी पहिले ग्रीन स्टेशन अवॉर्ड मिळाल्याने आनंद व्यक्त करत म्हटले की, हे मध्य रेल्वेच्या तमाम कर्मचार्‍यांची रात्रंदिवसाची मेहनत आणि त्यांच्या प्रयत्नाचा परिणाम आहे आणि याचे श्रेय सर्व लोकांना जाते. सीएसएमटी स्टेशनला ज्या वैशिष्ट्यांसाठी ग्रीन स्टेशन आणि गोल्ड अवॉर्डने सन्मानित होण्याची संधी मिळाली आहे यामध्ये स्टेशन विविध अपंग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी कम्प्युटर फ्रेंडली बनवले गेले आहे.

स्टेशनवर लावले गेले एलईडी लॅम्प
पार्किंग स्थळात इलेक्ट्रिक 2 आणि 4 व्हीलरला प्रोत्साहन देण्यासाठी काही पार्किंग ठिकाणांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट लावण्यात आले आहेत. स्टेशन स्थळाचे 15% पेक्षा जास्त क्षेत्र झाडे आणि छोट्या बगीचांनी अच्छादित आहे. जैविक खताने लँडस्केप क्षेत्र, लॉन इत्यादीची देखरेख केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन साईटवर 245 केडब्ल्यूपी सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. स्टेशनच्या 100% लॅम्प एलईडीमध्ये बदलण्यात आले आहेत.

विविध कार्यालये आणि प्रतीक्षालयांमध्ये 17 सेन्सरचे ऊर्जेचे बीएलडीसी आणि एचव्हीएलएस पंखे विविध ठिकाणी लावले आहेत. व्यापक मॅकेनाईज्ड क्लीनिंग कॉन्ट्रॅक्ट प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग स्थळ, ट्रॅक, रूफ टॉप, शटर, वेटिंग हॉल इत्यादीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ठेकेदारांद्वारे वापरली जाणारी रसायन बायो-डिग्रेडेबल आणि इको-फ्रेंडली आहेत.

स्मार्ट प्रवाशी सुविधा जसे की, वायफाय, स्वयंचालित तिकिट वेंडिंग मशीन्स, पर्यटन माहिती आणि बुकिंग केंद्र, खाद्य स्टॉल, फार्मसी आणि वैद्यकीय सुविधा इत्यादी उपलब्ध आहे. प्लास्टिक प्रतिबंधसंबंधी उपाय करण्यात आले आहेत. स्टेशनमध्ये प्लास्टिक बॅगचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक बॅगचे पर्यावरणावरील प्रतिकूल परिणामांची माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले बोर्ड आहेत.