Coronavirus Lockdown : पूजा, नमाजसाठी गर्दी करणार्‍यांवर कारवाई, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र काही लोक पूजा, प्रार्थना, नमाज पठणासाठी आणि इतर कार्यक्रमासाठी बाहेर येताना दिसत आहे. मात्र या निमित्ताने पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करा, असे आदेश मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पोलिसांना दिले आहे.

दिल्लीमधील निजामुद्दीन तबलिगी येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये हजारो लोक एकत्र आले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे अस्लम शेख यांनी संचारबंदी आणि जमावबंदीचे उल्लंघन करत पूजा आर्चा किंवा नमाज पठन तसेच इतर कोणत्याही धार्मिक कारणाने एकत्र येणाऱ्या पाचपेक्षा अधिक लोकांवर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले.

दरम्यान, आज राज्यात नवीन ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढून ५३७ झाली आहे. नव्यानं आढळलेल्या ४७ रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील २, अमरावती व पिंपरी-चिंचवड प्रत्येकी एकाचा समावेश आहे. काल प्रधानमंत्री यांनी धार्मिक कारणाने एकत्र येणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत त्यांच्या भाषणात दिले होते होते. त्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख यांनी पोलिसांना हे आदेश दिले.