सिध्दीविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी नव्हे, प्रेयसीला त्रास देण्यासाठी ‘खोडसाळपणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील प्रसिध्द सिद्धीविनायक गणेश मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून हे मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा मेसेज ठाण्यातील विवियाना मॉलमधील बाथरुममध्ये लिहिल्याचे समोर आले. त्यानंतर शहरात खळबळ उडाली. तर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाने प्रेयसीला त्रास देण्यासाठी खोडसाळपणाने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

काय लिहिले आहे मेसेजमध्ये ?

गझवा ए हिंद दुश्मनपर फतेह JIHAD-UL-AKBAR-TARGET DADAR SHIDDHI VINAYAK “BOOM” असा संदेश ठाण्यातील मॉलमध्ये लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे. गझवा ए हिंद या संघटनेच्या नावाने हा मेसेज लिहिण्यात आला आहे.

त्यानंतर ठाणे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून मंदिर परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र त्याच्याकडे तपास केल्यावर वेगळाच प्रकार समोर आला आहे.

खोडसाळपणातून हा प्रकार

पोलिसांनी केलेल्या तपासात मात्र वेगळेच समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण हा विक्रोळीतील असून त्याने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्याने एका मुलीला त्रास देण्यासाठी हे कृत्य केले असून धमकीचा मेसेज लिहित त्याखाली संबंधित मुलाचा मोबाईल क्रमांक लिहिला होता.

 मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर  असते. नेहमीच मुंबईला लक्ष्य केले जाते. मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे आणि गर्दीची ठिकाणे उडवून देण्याची धमकी दहशतवाद्यांकडून दिली जाते. मात्र आता महाराष्ट्रासह देशातील लोकांचे श्रध्दास्थान आहे.

मोठमोठ्या सेलिब्रेटींसह अनेक दिग्गज व्यक्ती सिध्दिविनायक मंदिरात येत असतात. सिद्धिविनायक मंदिर हे बॉलिवूडमधील सिने अभिनेते बीग बी पासून राजकिय नेत्यांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. मात्र सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली होती.

सिने जगत –
‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ