काय सांगता ! होय, मांजरीमुळं झाले शेजार्यांमध्ये तुंबळ हाणामारी, पोलिसांवर दगडफेक
ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेजाऱ्यांमध्ये भांडणं व्हायला कोणतंही कारण पुरतं, पण ते भांडण तेवढ्यापुरतं असंत. किरकोळ कारणामुळे भांडण असेल तर इतर शेजारी मध्यस्थी करून भांडण सोडवतात. पण मुंब्र्यात एक अजबच भांडण झालं आणि त्याचं पर्यवसान झालं लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात. आणि सर्वांत धक्कादायक म्हणजे हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली.
मुंब्र्यातील साईकिरण कॉलनीत राहणाऱ्या नासीर पटेल यांच्या घरातील मांजरीचा शेजाऱ्यांना होत होता. मांजराची तक्रार शेजारी खान कुटुंबाने केली त्यातून भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. ही हाणामारी रोखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे आणि त्यांचे पथक सोसायटीत पोहोचले. पोलीस शिपाई मयूर लोखंडे यांच्यावर जमावाने तुफान दगडफेक केली. मयूर यांच्या पायाला मार लागला असून, पोलीस शिपाई पर यांच्या टू-व्हीलरचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी लोखंडे यांनी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार शादाब खान, हैदर खान, ,रमजान इद्रीसी, हसीब शेख, नदीम कुरेशी, शोहेब खान, इब्राहिम खान,यासीन कुरैशी, अब्दुल छत्रीवाला, आरिफ पतंगवाला यांच्यासह 40 ते 50 अनोळखी व्यक्तींविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक कन्हैया थोरात पुढील तपास करत आहेत.