खाकीला सलाम ! आत्महत्या करण्यास निघालेल्या मुलीचा मुंबई पोलिसांनी वाचवला जीव
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जनतेच्या सतत सेवेत असणारे, आणि अतोनात २४ तास पोलीस प्रशासकीय कर्तव्य निभावणारे पोलीस हे कोणत्याही संकटात, आपत्तीत कोणत्याही अडचणीत त्यांनाच सामोरे जावे लागते. तर मुंबई येथील ताडदेव परिसरात एका कुटूंबामध्ये झालेल्या किरकोळ वादातून एक मुलगी आत्महत्या करण्यास जात असता तेव्हा पोलीस त्या स्थळी तात्काळ धाव घेऊन तिला समजावलं त्याक्षणी मुलींचेही विचार बदलले आणि ती वाचली.
अधिक माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणीने आपल्या कौटूंबिक वादातून रागाच्या भरात आत्महत्या करायचे ठरवून ती घराच्या छतावर चढली. इमारतीवरून खाली उडी मारणार होती त्या वेळी मुंबई पोलिस तात्काळ येऊन त्या मुलीची समजूत काढली आणि हा अनर्थ टाळला. ह्या घटनेबाबत माहिती मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिलीय. दरम्यान, ताडदेव पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्वरित ताडदेव पोलिस स्टेशनचं पथक संबंधित ठिकाणी पोहोचलं. पोलिसांनी तरुणीची समजूत काढत सर्वात आधी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणीला शांत केल्यानंतर आत्महत्येच्या निर्णयापासून तिचं मन वळवलं आणि तिला खाली उतरवण्यात आलं. ही तरुणी आता सुरक्षित असून कुटुंबाबरोबर असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीत पोलीस प्रशासनावर ताण असून देखील त्यांची सहकार्याची सवय कधी सुटत नाही. अनेकांच्या मदतीला धावून जाणे त्यांना अधिक कर्तव्याचे वाटत. या मुलीचा प्राण वाचल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.