Sharad Pawar : मुंडेंनी कोणताही हट्ट धरला नव्हता : शरद पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

” धनंजय मुंडे यांच्या हट्टामुळे आम्ही विधान परिषदेची जागा कराडांना दिली, हे साफ खोटे आहे. मुंडेंनी कोणताही हट्ट धरला नव्हता. त्यांचे मत वेगळे होते. तसेच त्यांना धक्का बसला हे जे सोशल मिडियात येतय तो त्यांच्यावर अन्याय आहे “, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्‍त केले. रमेश कराड यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करून परत माघार घेतल्यानंतर सोशल मीडियात धनंजय मुंडे यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चेबद्दल शरद पवार यांना विचारले असता ते बोलत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपवर उमेदवार पळवा पळवीची वेळ का आली, असा प्रश्‍न शरद पवार यांना विचारला त्यावर ते म्हणाले, मुंडें यांनी हट्ट केला हे खोटे आहे, त्यांचे मत वेगळे होते. त्यांना धक्का बसला हे जे सोशल मिडियात येतय तो त्यांच्यावर अन्याय आहे. परभणीची जागा राष्ट्रवादीची होती. मात्र, ही एकाच जिल्ह्यातील निवडणूक होती. पण बीडची जागा तीन जिल्ह्यातील असल्याने निवडणुकीपूर्वी तेथे पोहोचता येईल म्हणून थोडेसे धाडस म्हणून आम्ही आम्ही ती जागा घेतली. आर्थिक ताकद नसल्याने मी लढू शकत नाही, असे सांगून येथील उमेदवाराने माघार घेतली, असे पवारांनी स्पष्ट केले. कराड प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियात सुरु असलेले तर्क वितर्क पवार यांच्या खुलास्यामुळे थांबतील असे बोलले जात आहे.

संबंधित घडामोडी:
कर्नाटकमध्ये काँग्रेसच येणार : शरद पवार

सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने शरद पवार अडकले