भावनिकतेमुळं गाजलेल्या बहिण-भावाच्या लढतीकडे राज्याचे ‘लक्ष’

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या परळीतील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत ही लढत शेवटच्या टप्प्यात भावनिकतेवर आली. याच भावनिकतेचा फायदा पंकजा मुंडे यांना होणार असं वाट होतं. मात्र, धनंजय मुंडे यांनीही आपल्या आश्रूंना वाट करून देत सहानुभीची लाट तयार केली. त्यामुळे भावनिकतेच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघामध्ये घेतलेल्या सभेत एक वक्तव्य केले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठा वाद झाला होता. धनंजय यांनी बहिणीबद्दल अपशब्द काढल्याची प्रतिक्रीया येऊ लागली. यातच पंकजा मुंडे यांना भर सभेत भोवळ आली. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळेच पंकजा यांना भोवळ आली, धनंजय मुंडे चुकले असा मेसेज मतदारसंघात गेला. त्यामुळे पंकजा मुंडे यांना मतदारांकडून साथ मिळत असल्याचे पाहून धनंजय मुंडे यांनी देखील आरोप फेटाळून लावत सहानुभुतीची लाट तयार केली. आपण आपल्या बहिणीविषयी असे बोललोच नाही. जे बोललो ते कार्यकर्त्यांसाठी होते असे सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू सर्वांसमोर मांडली. त्यातच सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांना सपोर्ट करणारी मोहीम सुरु करण्यात आली. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे परळीत भावनिकतेचे राजकारण सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली. या भावनिकतेच्या खेळीचा फायदा कोणाला होणार हे येत्या 24 ऑक्टोबरला समजलेच. मात्र, सध्यातरी एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे यांचे पारडं जड आहे. या भावनिकतेच्या लढाईत चुरस निर्माण झाली आहे.

Visit : Policenama.com