Mundhwa Pune Crime News | खुनातील आरोपी एका तासात गजाआड, मुंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mundhwa Pune Crime News | पाणी मागितल्याच्या कारणावरुन बाचाबाची होऊन भांडण सुरु झाले.भांडणात एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या दगडाने, विटेने व लोखंडी गजाने मारहाण करुन खून केला (Murder In Mundhwa Pune). ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. गुन्ह्यातील आरोपीला मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) एका तासात अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. ही घटना आनंद निवास, कामगार मैदानाजवळील अर्धवट बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी घडली.(Mundhwa Pune Crime News)

श्रीकांत निवृत्ती आल्हाट (वय-42) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राकेश तुकाराम गायकवाड (वय-35 रा. आनंद निवास, कामगार मैदानाजवळ, मुंढवा गाव, पुणे) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मयत श्रीकांत यांचा भाऊ संतोष निवृत्ती आल्हाट (वय-46 रा. भावना निवास, महम्मदवाडी, हडपसर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ श्रीकांत याने आरोपी राकेश याच्याकडे रात्री उशिरा पाणी मागितले. राकेश याने पाणी दिले नाही म्हणून श्रीकांत याने राकेशला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने राकेश याने श्रीकांत याच्या डोक्यात विटेने व सिमेंटच्या दगडाने मारहाण केली. तसेच श्रीकांत याचे डोके भिंतीवर जोरात आपटून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत आल्हाट यांना ससुन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालात श्रीकांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत व इतर अंगावर जखमा होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा तीन पथके व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेऊन एका तासात अटक केली.
पोलिसांनी राकेश गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग (अतिरिक्त कार्यभार पूर्व प्रादेशिक विभाग) प्रविण पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस उपायुक्त आर राजा,
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी,
सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी, पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे, पोलीस उपनिक्षीक महादेव लिंगे,
महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार संतोष जगताप, तुळशीराम रासकर, दिनेश भांदुर्गे, राजु कदम,
दत्ताराम जाधव, रविंद्र देवढे, योगेश गायकवाड, जगदिश महानोर, किरण बनसोडे, राहुल मोरे, सचिन पाटील, स्वप्निल रासकर,
निलेश पालवे, दयानंद गायकवाड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अग्रवाल दांपत्यासह आरोपी मकानदारच्या पोलीस कोठडीत 14 जून पर्यंत वाढ; मकानदारला दिलेल्या 4 लाखांपैकी 3 लाख जप्त

Otur Pune Crime News | नशेसाठी ज्येष्ठाचा खून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक; चार अल्पवयीन मुले ताब्यात

Maharashtra School Uniform | राज्यातील शाळांमध्ये 15 जूनपासून ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना लागू

NEET Exam | नीट परीक्षेच्या पावित्र्याला धोका; सुप्रीम कोर्टाने NTA ला बजावली नोटीस