पुणे : Mundhwa Pune Crime News | शहरात कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान मुंढव्यातील हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या चालविल्या जाणार्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime Branch)
गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक युवराज हांडे (PI Yuvraj Hande) व पोलीस अंमलदार हे मुंढवा परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवून हॉटेलची तपासणी करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार तानाजी देशमुख यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, हॉटेल स्वे या ठिकाणी अवैधरित्या हुक्का पुरविला जातो आहे. त्यावेळी लागलीच पोलिसांनी हॉटेल स्वे या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. हॉटेलमधील हुक्का पिण्याचे साहित्य, हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा ७ हजार रुपयांचा माल जप्त केला. हॉटेल चालक तसेच हॉटेल मॅनेजर यांच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police Raid On Hookah Parlours)
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीखक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, पृथ्वीराज पांडळे, शुभांगी म्हाळशेकर, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली आहे.