Mundhwa Pune Crime News | पुणे : उसने पैसे दिलेले मागितल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mundhwa Pune Crime News | हात उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला धक्काबुक्की करुन दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंढवा येथील बी.टी. कवडे रोड (BT Kawade Road) आणि कै. बाळासाहेब रामभाऊ कवडे क्रिडांगण येथे रविवारी (दि.2) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली असून मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. (Attempt To Murder)

याबाबत जखमी राजेंद्र तिरपतय्या केतनबोईना (वय-28 रा. बी.टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन द्वारका बाबू बलबद्रा (वय-42 रा. कृष्णाई नगर, बी.टी. कवडे रोड, मुंढवा), जेम्स बाबू बलबद्रा (वय-24), जोयेल बाबू बलबद्रा (वय-20) त्यांचा नातेवाईक मेशक (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 307, 326, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन जेम्स बलबद्रा, जोयेल बलबद्रा आणि मेशक यांना अटक केली आहे.(Mundhwa Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी राजेंद्र यांनी आरोपी द्वारका बलबद्रा हिला हात उसने पैसे दिले आहेत.
राजेंद्र आरोपी महिलेकडे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिने फिर्यादी यांना धक्काबुक्की केली.
तर जेम्स आणि जोयेल यांनी फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी द्वारका बलबद्रा यांच्या मुलांनी फिर्यादी यांना कै. बाळासाहेब रामभाऊ कवडे क्रिडांगण येथे बोलावून घेतले. त्यामुळे फिर्यादी त्याठिकाणी गेले असता आरोपींनी त्यांना लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल. पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्याची कलम वाढ केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला

Pune Municipal Corporation (PMC) | महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर; विकासकामांच्या फायली गहाळ झाल्या की केल्या?

Kalyaninagar Porsche Car Accident Pune | ‘त्या’ला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; बाल न्याय मंडळाचा आदेश

PBG Kolhapur Tuskers | ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठी; संघमालक पुनीत बालन यांची घोषणा