Mundhwa Pune Crime News | वाहनचोरी करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ! वाहनचोरीचे 3 गुन्हे उघडकीस, मुंढवा पोलिसांची कामगिरी

Mundhwa Pune Crime News | The inn thief who steals a car is in the police net! 3 cases of vehicle theft revealed, performance of Mundhwa police
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mundhwa Pune Crime News | संशयास्पदरित्या थांबलेल्या तरुणाला पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो सराईत वाहन चोरटा असल्याचे आढळून आले. मुंढवा पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून वाहनचोरीचे ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. (Vehicle Theft Detection)

अमित अवधेश यादव Amit Avadhesh Yadav (वय २२, रा. रघुवीरनगर, वडगाव शेरी मुळ गाव दरभंगा, बिहार) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे (Mundhwa Police Station) तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना हडपसर रेल्वे स्टेशनजवळील (Hadapsar Railway Station) मुंढवा ब्रीज खाली मोटार सायकलसह संशयास्पदरित्या थांबलेला आढळून आला. त्याच्याकडे मोटारसायकलच्या कागदपत्राची चौकशी केल्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुंढवा पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडील ती मोटारसायकल चोरीची असल्याचे दिसून आले. अधिक चौकशीत त्याने वाहनचोरीचे ३ गुन्हे केल्याची कबुली दिली. मुंढवा, हडपसर (Hadapsar Police Station), यवत पोलीस ठाणे (Yavat Police Station) असे तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh), वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप (PI Nilkanth Jagtap), पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम (PI Babasaheb Nikam) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख आर.व्ही. महानोर, पोलीस अंमलदार राजु कदम, शिवाजी जाधव, विनोद साळुंखे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, पोपट माने, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, गणेश सोनवणे यांनी केली आहे.(Mundhwa Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांकडून पत्ते उघड? म्हणाले, “विधानसभा निवडणुकीनंतर …”

Bibvewadi Pune Crime News | दिव्यांग आयुक्त असल्याचे भासवून दिव्यांगाला 39 लाखांना गंडा

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | आता चिंचवडच्या आखाड्यात शरद पवार राजकीय डाव टाकणार? बडा नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत?

Sharad Pawar NCP | पक्षातल्या इन्कमिंगवर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले – “त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत,पण …”

Total
0
Shares
Related Posts