सराफाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले तर, सोसायटीमध्ये टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –Mundhwa Pune Crime News | शहरातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधक बोट दाखवत असतानाच मुंढव्यात त्याचे प्रत्यंतर आलेले एकाच रात्रीत दिसून आले. बी टी कवडे रोडवरील (BT Kawade Road Pune) सराफाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यात (Robbery Case) आले तर, दुसरीकडे सोसायटीमध्ये घुसून एका टोळक्याने तीन गाड्यांची तोडफोड (Car vandalism) केल्याचे समोर आले आहे.
दुकानात दिवसभराचा हिशोब लिहीत असताना दुकानात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सराफाच्या चेहर्यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी दुकानातील अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेले.
याबाबत वालचंद आचलदासजी ओसवाल (वय ७७, रा. नाना पेठ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील बोराटे वस्तीमधील अरीहंत ज्वेलर्स या दुकानात रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी (Mundhwa Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अरीहंत ज्वेलर्स नावाने बी टी कवडे रोडवर सराफी दुकान आहे. ते रविवारी रात्री दुकानात बसून दिवसभराचा हिशोब वहीत लिहीत बसले होते. साधारण रात्री साडेनऊ वाजता दोन चोरटे दुकानात शिरले. त्यांच्यातील एकाने दुकानाचे शटर अर्धवट ओढले. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या चेहर्यावर कोणता तरी स्प्रे मारला. दुसरा चोरटा सोन्याचे दागिने घेऊ लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला. त्यावर त्याने कंबरेचे लोखंडी हत्यार काढून ‘चुप बैठो’ असे म्हणत त्यांच्या डाव्या खांद्यावर मारले. ते दोघे हाताला लागतील ते दागिने घेऊन पळून गेले. चोरट्यांनी सोन्याचे चमकी पान, सोन्याचे गलसन, सोन्याचे डोरले वाटी असा २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, निखिल पिंगळे, राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख, प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, काळगे, पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे तपास करीत आहेत.
हा प्रकार ताजा असतानाच मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोसायटीत घुसुन एका टोळक्याने पार्क केलेल्या तीन गाड्यांची तोडफोड केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Nana Patole | ‘महायुती सरकारने महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद द्यावे’ : नाना पटोले