दारूच्या नशेत ‘झिंगाट’ पोलीस अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांनाच ‘धमकी’

मुंगेर/बिहार : वृत्तसंस्था – सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता पोलीस देखील दिवसाढवळ्या दारू पिऊन झिंगाट होताना पहायला मिळत आहे. इतर लोकं दारूच्या नशेत येणाऱ्या-जाणऱ्यांना शिविगाळ धमकी देतात. मात्र, बिहारमध्ये एका झिंगलेल्या पोलीस अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिली आहे. बिहारमध्ये दारू बंदी असून पोलिसांकडून दारूबंदीची खिल्ली उडवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बिहारमधील मुंगेर शहरात एका तुरूंगात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांना धमकी देण्याचा प्रताप केला आहे.

विनय कुमार सिंह असे मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते शहरातील मुख्य रस्त्यावर दारू पिऊन बसले होते. रस्त्यावर सुरू असलेल्या गोंधळामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विनय कुमार सिंह याला जबदस्तीने गाडीत टाकून नेले.

पोलिसाचा रस्त्यावर धिंगाणा
मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याने दारूच्या नशेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, डीआयजी, एसपींना शिव्या घातल्या. या पोलीस अधिकाऱ्याचे नाटक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दारूच्या नशेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याला अटक केली.

दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा
मुख्यालयाती पोलीस उपायुक्त मोहम्मद शिबली नोमानी यांनी या घटनेबाबत बोलाताना सांगितले, पोलिसांना माहिती मिळताच नशेत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दारूबंदी कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदवून विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. बिहारमध्ये दारूबंदीचे कठोर कायदे आहेत आणि त्यावर पोलिसांकडून सातत्याने छापे घातले जातात. या प्रकरणात दारूच्या अनेक गुन्ह्यांमध्ये बडगा उगारला होता. आणि त्यासंबंधित बऱ्याच लोकांना अटक करून तुरूंगात पाठवले असल्याचेही नोमानी यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/