मुलीला ‘प्रपोज’ करण्यासाठी चॉकलेटनं सजवला कॉलेजचा ‘कॅम्पस’, सिनिअर विद्यार्थ्यांनी केले ‘हाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील आरडी अँड डीजे कॉलेजमध्ये सोमवारी एका मुलाने आपल्या प्रेमिकेला फिल्मी स्टाईलने प्रोपोज केल्याचे पाहायला मिळाले. मात्र हे प्रकरण त्याला चांगलेच महागात पडले असून कॉलेजच्या मैदानावर तयार केलेल्या स्टेजला चॉकलेट, बिस्कीट आणि फुग्यांनी सजवले होते. मात्र काही वरिष्ठ विद्यार्थ्यांना हि गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी त्याच्या सजावटीला आग लावत सर्व पेटवून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 वी मध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे एका मुलीवर प्रेम होते. त्यामुळे सोमवारी त्याने तिला फिल्मी स्टाईलने प्रपोज करण्याचे ठरवले. यासाठी त्याने मैदानावर स्टेज तयार करून तो चॉकलेट, फुगे आणि बिस्किटांनी सजवला. त्यामध्ये स्वतःचे आणि प्रेमिकेचे नाव टाकले होते. मात्र त्याने आपले प्रेम व्यक्त करण्याआधीच काही गुंड विदयार्थ्यांनी त्याच्या सजावटीची तोडफोड करत त्याला आग लावून दिली.

सजावटीला लावली आग
हि गोष्ट या गुंड विद्यार्थ्यांना न आवडल्याने त्यांनी या स्टेजची तोडफोड करत या स्टेजला आग लावून दिली. तसेच या विद्यार्थ्याला देखील तेथून पळवून लावले. त्यामुळे नाराज झालेला हा विद्यार्थी त्या ठिकाणाहून निघून गेला.

कॉलेज प्रशासन अनभिज्ञ
जवळपास दोन तास चाललेल्या या प्रकाराबद्दल कॉलेज प्रशासनाला काहीही माहिती नाही. याविषयी त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. त्यामुळे सध्या कॉलेजमध्ये या प्रेम प्रकरणाची आणि आगीच्या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

Visit : Policenama.com

You might also like