नगरसेवक दिपक मानकरांच्या अडचणीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठाने नकार दिला आहे. मानकरांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी शुक्रवारी असमर्थता दाखवली आहे.

मानकर यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पण याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाने असमर्थता दाखविली. त्यानंतर मानकर यांनी दुसर्‍या खंडपीठापुढे याचिका सादर केली होती. त्याही खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे आता मानकर यांना नव्या खंडपीठासमोर याचिका सादर करावी लागणार आहे. शहर पोलिस दलातील गनमॅन शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी काही दिवसांपुर्वी हडपसर रेल्वे स्टेशनसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी आणि इतरांची नावे होती. लोहमार्ग पोलिसांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी मानकर आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा तपास समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी काही जणांना अटक केली तर दोघेजण स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले होते.

दिपक मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे त्यांनी दुसर्‍या खंडपीठाकडे अर्ज सादर केला होता. दुसर्‍या खंडपीठाने देखील त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे मानकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्यांनी पुन्हा नव्या खंडपीठासमोर याचिका सादर करावी लागणार आहे.

आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकीविरूध्द गुन्हा

जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांना अटक

राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला