Municipal Corporation Election | प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी, कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय स्थानिक नेते घेतील – अजित पवार (व्हिडीओ)

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह, अजित पवार म्हणतात...

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  Municipal Corporation Election | महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सरकार आपली पाच वर्षे पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. राज्याप्रमाणे महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत महाविकास आघाडी करण्यासंदर्भात चाचपणी केली जातेय. दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी आजवर अनेकवेळा स्वबळावर लढण्याचा सूर आवळला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विधानामुळे स्वराज्य संस्था निवडणुकांत (Municipal Corporation Election) महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 

प्रत्येक जिल्ह्याची स्थानिक परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतील आजवरचा अनुभव पाहता,
कोणासोबत आघाडी करायची हा अधिकार आम्ही जिल्ह्याला देतो. सध्या राज्यामध्ये कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP)आणि शिवसेना (Shivsena) असे तीन पक्षांचे सरकार आहे.
मात्र त्या त्या जिल्ह्यातील नेते आघाडी संदर्भात निर्णय घेतील, असं विधान अजित पवार यांनी केले आहे. बारामती (Baramati) येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ताकद आहे, तिथे सहाजिकच त्यांना जास्त जागा मिळण्याची अपेक्षा असते, काही ठिकाणी कॉंग्रेसला तसं वाटू शकत.
जिथे आमची ताकद तिथे आम्हाला जास्त जागा मिळाव्या म्हणून आग्रही असतो.
अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नेत्यांना जबाबदारी दिल्यास आपण कशाप्रकारे आघाडी करायची हा निर्णय ते घेऊ शकतात.
त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर (Municipal Corporation Election) निर्णय घेण्यात येणार आहे.
शिवसेना व कॉंग्रेसचे नेते त्यांचा निर्णय घेतली, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

 

Web Title : Municipal Corporation Election | The situation in each district is different, local leaders will decide who to lead – Ajit Pawar (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dombivli Gang Rape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण ! आरोपींकडून अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर

Lonand Crime | धक्कादायक ! चक्क उद्घाटनादिवशीच ज्वेलरी शाॅपमध्ये चोरी, पुण्यातील महिलेसह दोघे ताब्यात

Gold Silver Price Today | खूशखबर ! सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीची किंमत सर्वात कमी, जाणून घ्या

Maharashtra Cinema Hall Reopen | राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार