Kolhapur News : महापालिका हद्दवाढीसाठी अद्ययावत माहिती संकलित होणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भातीलअद्ययावत माहिती प्रशासनाकडून केले जाणार आहे. याचबरोबर महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे हद्दवाढीसंदर्भातील प्रस्ताव, फाइलींची मागणी संबंधित विभाग प्रमुखाकडे केली असून, त्यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या महापालिकेची मुदत संपली असेल त्याची निवडणूक होत नाही तोपर्यंत क्षेत्रात बदल करता येत नाही. यामुळे कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेण्याचे ठरविले आहे. त्यांनी संबंधित विभागाकडून शासनाला पाठवलेले प्रस्ताव, हद्दवाढीच्या फाइल, केलेले पत्रव्यवहार यांची मागणी केली आहे.

ही माहिती पाहून त्या पुढील निर्णय घेणार आहेत. तसेच प्राधिकरणची स्थापना नेमकी कशासाठी केली. त्यांची जबाबदारी काय आहे, याचीही माहीती संबंधित विभाग प्रमुखाकडून घेणार आहेत. या दरम्यान, महापालिकेचा नगररचना विभाग हद्दवाढीसंदर्भातील नवीन नियमानुसार कागदपत्रांची पूर्तात करून ठेवणार आहे. यामध्ये प्रस्तावित गावे व शहर यामधील भौगलिक संलग्नता, लोकसंख्या आणि उत्पन्न वाढीचा वेग यांची अद्ययावत माहिती संकलित करणार आहे