नगरसेविका परविन फिरोज यांची शहर सुधारणा समिती सदस्यपदी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेतील विवध विषय समितीच्या सदस्यांची आज (शुक्रवार) निवड करण्यात आली. शहर सुधारणा, महिला व बाल कल्याण, क्रीडा, विधी समितीच्या सदस्यांची आज निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका परविन हाजी फिरोयांची शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

पुणे महापालिकेत झालेल्या मुख्य सभेत ही नियुक्ती करण्यात आली. आज निवड करण्यात आलेल्या प्रत्येक समितीच्या सदस्यांची संख्या १३ आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे ८, राष्ट्रवादी ३, काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी १ सदस्याची निवड करण्यात आली.
मागील दोन वर्षांपूर्वी याच दिवशी प्रभाग क्र. २७ ब मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते.

परवीन हाजी फिरोज शेख, हाजी अब्दुल गफूर पठाण व हमीदा अनिस सुंडके यांची भरघोस मताधिक्याने निवड झाली होती. आज झालेल्या निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका परवीन हाजी फिरोज शेख बोलत होत्या.