Municipal Election Pune Division | पुणे विभागातील 41 नगरपालिकांवर ‘प्रशासकराज’, निवडणुका लांबल्याने निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महसूल विभागातील (Pune Revenue Department) बहुतांश नगरपालिकांच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपल्याने आणि निवडणुका (Municipal Election Pune Division) लांबणीवर पडल्याने 41 नगरपालिकांवर प्रशासकाची (Administrator) नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara) व सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 41 नगरपालिकांचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) पेच न सुटल्याने नगरपालिका निवडणुका (Municipal Election Pune Division) लांबणीवर पडल्या आहेत.

 

पुणे महसूल विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील 41 नगरपालिकांच्या सध्याच्या सभागृहाची मुदत 29 डिसेंबर ते 17 फेब्रुवारी या दरम्यान संपणार आहे. कोरोना संसर्गामुळे (Corona Infection) या नगरपालिकांच्या निवडणुका (Municipal Election Pune Division) होऊ शकल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर किमान 6 महिने निवडणुका होण्याची शक्यता आता मावळली आहे. कारण हा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याची विनंती राज्य सरकार (State Government) निवडणूक आयोगाला (Election Commission) करणार आहे.

या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या सर्व नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती केली जाणार आहे. मुख्याधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांची मुदत येत्या दोन दिवसांत संपणार आहे. यामुळे जिल्ह्यातील मुरगूड, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा, इचलकरंजी, पेटवडगाव, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि मलकापूर या नगरपालिकांवर गुरुवार (दि.30) पासून प्रशासक येणार आहे.

 

Web Title :- Municipal Election Pune Division | ‘Administrator’ on 41 municipalities in Pune division, decision due to election delay

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Food Poisoning Navguru Institute | भोर येथील नवगुरु इंस्टिट्यूटमधील 28 मुलांना विषबाधा; 6 जणींची तब्बेत खालवल्याने ससूनमध्ये दाखल

 

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्ला ! फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारला दिलासा, कोर्टाने थेट केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले ‘हे’ निर्देश

 

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! द गेमचेंजर्स संघाचा विजयाचा षटकार; वैंकिज् इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 2172 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Narayan Rane | नारायण राणेंचा जोरदार हल्ला, म्हणाले – ‘आदित्य आणि मांजराचा काय संबंध, अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे’