Municipal Elections | मंत्री बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महापालिका 3 सदस्यीय प्रभागाचा बुधवारी फेरविचार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Municipal Elections | राज्य सरकारने नुकतंच आगामी पालिका निवडणुकीवरुन (Municipal Elections) एक मोठा निर्णय घेतला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई वगळता इतर सर्व महापालिका निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल याबाबत घोषणा करण्यात आली. या पार्श्वभुमीवर काॅग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

महापालिका निवडणूकीसाठी (Municipal Elections) 3 सदस्यीय प्रभाग हा मंत्रीमंडळाचा सामूहिक निर्णय आहे.
परंतु, त्यात मतमतांतरे असू शकतात, त्यामुळे येत्या बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर फेरविचार होऊ शकतो असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, तर, यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे, तसेच काही मते वेगळी असणेही शक्य आहे.
मंत्री मंडळात निर्णय झाला त्यावेळी एकमतानेच झाला. नंतर यावर झालेल्या चर्चेत काही जणांची मते वेगळी असल्याचे लक्षात आले.
त्याचाही विचार व्हायला पाहिजे. असं त्यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Municipal Elections | Minister Balasaheb Thorat’s big statement, said – ‘Municipal 3 member ward reconsidered on Wednesday’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SSC Selection Post Phase 9 2021 | सरकारी नोकरीचा शोध संपणार, एसएससीने 3261 पदांसाठी काढली ‘व्हॅकन्सी’

Actress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा शेट्टीने घेतला सुटकेचा श्वास

Solapur Crime | कारवाईसाठी गेल्यानंतर वाळू माफियानं पोलिस कर्मचार्‍याला चिरडलं, जागीच मृत्यू झाल्यानंतर खळबळ