Municipal Elections | ‘महाविकास’मध्ये प्रभाग सदस्यीय संख्येवरून अद्याप एकमत नाही?, 3 सदस्यीय प्रभागाच्या बातम्यांमुळे राजकिय वातावरण ‘नरम-गरम’; नगरसेवक व इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Municipal Elections | बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सदस्यांतील अपसातील वादात विकास रखडत असल्याने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका (Municipal Elections) घेण्याचा वर्षभरापुर्वी निर्णय घेणार्‍या महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) अद्यापही प्रभाग रचनेबाबत अंतिम निर्णय घेता आला नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कालपासून आघाडीतील घटक पक्षाच्या मंत्र्यांच्या चर्चेच्या फेर्‍या तसेच मंत्री मंडळाच्या बैठकीतही एका प्रभागामध्ये किती सदस्य असतील याचा ठोस निर्णय न झाल्याने नगरसेवक व इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली आहे.

आगामी महापालिका निवडणुका (Municipal Elections) चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात याव्यात असा प्रस्ताव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी मंत्री मंडळापुढे ठेवला होता. दरम्यान या प्रस्तावावरून कालपासूनच आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेर्‍या सुरू होत्या. कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात यावी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा आग्रह धरला. अगदी मंत्री मंडळाच्या बैठकीतही तीनही पक्ष ठाम राहील्याने अखेर केवळ अध्यादेश काढून दोन पेक्षा कमी नाही व चार पेक्षा अधिक सदस्य नसतील असा स्थानीक परिस्थितीनुसार निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, महाविकास आघाडीमधील या सदस्य संखेच्या गोंधळामुळे आज सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला.
आज सकाळपासून दोनचा की तीनचा प्रभाग यावरून राजकिय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आणि नेत्यांसोबत फोनाफोनी सुरू होती.
संध्याकाळी मंत्री मंडळ बैठक सुरू असतानाच मुंबई वगळता ‘तीन’ सदस्यीय प्रभागांचा निर्णय झाल्याच्या ‘सूत्रांच्या’ हवाल्याच्या बातम्यांनी राजकिय वातावरण ढवळून निघाले.
महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सभागृहनेते गणेश बिडकर यांनी महाविकास
आघाडीला तीनच्या प्रभागावरून टपल्या मारायला सुरूवात केली.
तर महापौरांसह काही पक्षनेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली.
तोपर्यंत मात्र अधिकृत अशी कुठलिच घोषणा झालेली नव्हती.

 

मात्र, आठ वाजण्याच्या सुमारास राज्य शासानाच्यावतीने ‘महासंवाद’वर टाकण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये केवळ बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय फ्लॅश झाला.
यामध्ये प्रभागात नगरसेवकांची दोन पेक्षा कमी नाही आणि चार पेक्षा अधिक संख्या नसेल.
असा उल्लेख करण्यात आल्याने गोंधळात आणखीनच भर पडली.
यामध्येच शासन अध्यादेश काढून लवकरच कोणत्या महापालिकेत किती सदस्यीय प्रभाग असतील हे जाहिर करेल असेही नमूद करण्यात आल्याने संध्याकाळी चर्चेचा सूर पालटल्याचे पाहायला मिळाले.

 

Web Title : Municipal Elections | There is still no consensus on the number of ward members in ‘Mahavikas’? However, the pressure of corporators and aspirants increased

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 192 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Thackeray Government | महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार – ठाकरे सरकार

Former MLA Mohan Joshi | बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फेरविचार करा – माजी आमदार मोहन जोशी