मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची उचलबांगडी, घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे.

डेंग्यू सदृश आजाराने वैदूवाडी येथे राहणारे महापालिकेचे कंत्राटी कामगार बाबाजी शिंदे मृत्यू प्रकरणात डॉ. बोरगे वादग्रस्त ठरले होते. तसेच कंत्राटी कामगारांना डॉ. बोरगे यांनी महापालिकेऐवजी शेतात काम करण्यास भाग पडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची उपायुक्त सुनील पवार यांनी चौकशी करून आपला अहवाल आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिला होता. त्याच आधारावर ही बदली करण्यात आली.

बदलीमुळे डॉ. बोरगे यांना कमी दर्जाचे पद देण्यात आले आहे, ही त्यांना शिक्षा मानली जाते. त्यांच्या जागेवर डॉ. सतीश राजूरकर यांना पदभार देण्यात आला आहे. आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे हे चांगलेच वादग्रस्त ठरले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like