महापालिकेच्या ‘त्या’ अधिकाऱ्याने केला महिलेचा विनयभंग 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपळे सौदागर येथे थांबलेल्या महिलेचा महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने  विनयभंग केला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

या प्रकरणी 33 वर्षीय विवाहित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब पाराजी होडगर (42, रा. केशवनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिंपळे सौदागर येथे थांबल्या असताना आरोपी होडगर याने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करीत त्यांचा विनयभंग केला. तपास वाकड पोलिस करीत आहेत.