‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी पालिकेचा कालबध्द कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना सर्वप्रकारच्या आजारांसाठी केंद्र शासनाकडून सुरू केलेली आयुष्मान भारत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम करण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

आयुष्मान भारत या योजनेची शहरात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. राव यांनी ही माहिती दिली.

सुमारे १ लाख ४३ हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याची यादी मनपा आरोग्य विभागाला उपलब्ध झाली आहे. प्रभागनिहाय या यादीची विभागणी करण्यात येणार आहे. क्षेत्रिय अधिकारी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय कार्यालयानुसार बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करणार आहे.

योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार आहे. असे गोगावले यांनी कळविले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून केंद्र शासनाने शहरात निश्‍चित केलेल्या रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जाणार आहेत.

Loading...
You might also like