पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांचा कचरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी निम्म्याहून अधिक कचरा देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये टाकला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून कॅपिंग केलेल्या जागेवर पुन्हा कचर्‍याचे ढीग रचण्यात येत आहेत. विशेष असे की ओला व सुका असा मिक्सड कचरा आणि प्रक्रिया होउ न शकणारा कचरा (रिजेक्ट) एकत्रच टाकला जात आहे. आता त्याच कचर्‍याचे बायोमायनिंग करून येथील २० एकर जागेवरील ९ लाख मेट्रीक टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदा राबविली गेल्याने प्रयोगशील पुणे महापालिकेचे पितळ उघडे झाले असून आतापर्यंत पुणेकरांचा पैसा कोठे जिरला? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58577e4f-ba32-11e8-b82d-91259f4f4a5d’]

 देवाची उरूळी येथील कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत हरित लवादामध्ये दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान महापालिकेने डेपोतील कचर्‍याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. विहित मुदतीत यासाठीची निविदा प्रक्रिया राबवून पुढील पाच वर्षात देवाची उरूळी येथील १६५ एकर जागेपैकी २० एकर जागेवरील कचर्‍याची विल्हेवाट लावून तेथील जागा रिकामी  करण्यात येणार आहे. बायोमायनिंग प्रक्रियेमध्ये कचर्‍याचे विलगीकरण करून प्रक्रिया योग्य कचर्‍यापासून खत आणि जळाउ इंधन  तयार करण्यात येणार आहे. तर ज्या कचर्‍यावर प्रक्रिया होउ शकत नाही असे दगड, चिनी मातीची भांडी व पुर्नप्रक्रिया न होणारा (रिजेक्ट) कचरा याच डेपोच्या आवारातील ४० एकर जागेत जिरविण्यात येणार आहे.

पंतप्रधान वाढदिवस साजरा करणार वाराणसीत

कचरा डेपोच्या सध्याच्या आवाराची परिस्थिती पाहील्यास पुणे महापालिका पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. १६५ एकरपैकी ४० एकरवरील कचर्‍यावर कॅपिंग करण्यात आले आहे. कचरा मातीने झाकून त्यावर झाडे लावण्यात आली आहेत. त्यापैकी २० एकरचा परिसर सोडला तर कॅपिंग केलेल्या उर्वरीत जागेवर पुन्हा शहरातील कचरा आणून टाकला जात आहे. नवीन निविदा प्रक्रियेत ज्या ४० एकर जागेवर या प्रकल्पातून निर्माण होणारे रिजेक्ट जिरवावे (लँडड्रील)असे सांगितले आहे, तेथेही शहरातील मिक्स कचरा आणि अन्य प्रक्रिया प्रकल्पातील कचरा टाकण्यात येत आहे. या लगतची २० एकर जागा यापुर्वीच्या प्रक्रिया प्रकल्पांना देण्यात आली आहे. सुरवातील सेल्को आणि हंजर कंपनीकडून चालविण्यात येणारे नंतर संपुर्णत हंजर कंपनीच्या ताब्यात दिलेला एक हजार टन क्षमतेचा हा प्रकल्प भग्नावस्थेत आहेत. याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तसेच देवाची उरूळी उंड्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुमारे २० एकरच्या खाणीमध्ये कचरा डेपोतून निघणारे लिचेट साठविण्यात येत होते. ही खाण बुजवून त्यावर सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे. तसेच सुमारे आठ ते दहा एकर जागा अंतर्गत रस्ते, वजन काटा, आरोग्य निरीक्षक कोठ्या व अंतर्गत सुविधेसाठी वापरण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B01M0KDLIW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b4921c52-ba34-11e8-969f-eb54070ca5d7′]

महापालिकेची सध्याची भुमिका पाहाता ओला आणि सुका अशा मिक्स कचर्‍यावर बायोमायनिंग करण्यात येणार आहे. वास्तकित: बायोमायनिंग ही प्रक्रिया अनेकवर्ष कुजलेल्या कचर्‍यापासून निर्माण झालेली माती आणि न जिरणारा कचरा वेगळा करणे. कचर्‍यापासून निर्माण झालेल्या मातीचा खत म्हणून वापर करणे तसेच न जिरणार्‍या कचर्‍याचा (रिजेक्ट) वापर करून खाणी वा मोठे खड्डे बुजवून (लँडङ्गिलिंग) ती जागा पुर्नवापरात आणणे, असा साधा ढोबळ अर्थ आहे. परंतू कचरा डेपोची सध्याची परिस्थिती पाहाता बहुतांश भागात दररोज टाकल्या जाणार्‍या मिक्स कचरा रिजेक्टच मोठ्याप्रमाणावर आहे. शहरातील सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमधील रिजेेक्टही ओल्या कचर्‍यामध्येच टाकले जात आहे. यामुळे घरी फिरून गोळा केल्या जाणार्‍या वर्गीकृत कचरा पुन्हा एकत्रित केला जात आहे.

एक हजार टन क्षमतेच्या बायोमायनिंगवर स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष
शहरात यापुर्वी सुरू केलेले ५०० हून अधिक टन क्षमतेचे कचरा प्रकल्प हे एकतर बंद पडले आहेत किंवा पुर्ण क्षमतेने कधीच चाललेले नाहीत. यानंतरही महापलिकेने देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये एक हजार टन क्षमतेचा बायोमायनिंग प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला आहे. विशेष असे की यासाठी प्रतिटन ६४६ रुपये प्रतिटन या दराने निविदा आली असून अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. ही निविदा ज्या भुमि ग्रीन कंपनीला देण्यात आली आहे, तीच कंपनी सध्या हडपसर येथे २०० तर वडगाव येथे १५० टन कचर्‍याचे प्रकल्प चालविते. याच कंपनीला पुन्हा एक हजार टनचे काम देण्यासाठी हरित लवादाची भिती दाखवून अधिकारी आणि सत्ताधार्‍यांनी रिंग केली आहे. यापुर्वीच्या हंजर कंपनीसारखे या कंपनीला टाळे लागल्यास पुण्यात कचर्‍याची आणीबाणी निर्माण होईल, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
शहरात दररोज गोळा होणारा कचरा                                     – २००० ते २१०० टन
लगतच्या गावांमधून गोळा होणारा कचरा                               – १०० ते १५० टन
एकूण                                                                             – २१०० ते २२५० टन
दररोज प्रक्रिया केला जाणारा कचरा                                        – ८९०  टन
शेतात टाकला जाणारा ओला कचरा                                        -१०० ते १२५ टन
सोसायट्यातील गांडूळ खत प्रकल्पात दररोज जीरणारा कचरा  – ६० टन
एकूण                                                                                  – १०५० ते १०७५ टन
कचरा प्रक्रियेतील पालिकेचे ‘पितळ’ उघडे                             –  १०५० ते ११७५ टन
प्रक्रिया प्रकल्पातून निघणारे रिजेक्ट                                  –   १०५ टन
एकूण                                                                            –   ११५५ टन ते १२८० टन

प्रत्यक्षात ११५५ टन ते  १२८० टन कचरा कचरा देवाची उरूळी येथे टाकला जातो.

पालिका म्हणते ९०० ते १००० टन कचरा टाकला जातो.

 


थोडक्यात महत्वाचे
  •  पुण्यामध्ये किती कचरा गोळा होतो, याची निश्‍चित आकडेवारी  पालिकेकडे नाही.
  • पालिका म्हणते २००० ते २१०० टन कचरा निर्माण होतो. परंतू घनकचरा व्यवस्थापन पुरस्कारासाठी पाठविलेल्या माहितीमध्ये १६०० टन कचरा निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  • शहरातील ६० टक्के कचरा वर्गीकृत असतो. अर्थात १२०० टन.
  • पालिकेच्या म्हणण्यानुसार १०६१ टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. प्रत्यक्षात यापैकी १०० ते १२५ टन कचरा शेतात टाकला जातो.
  •  एक एकर जागेमध्ये एका ठराविक उंचीपर्यंत किती कचरा साठविला जातो, याचा पालिकेने अभ्यास केलेला नाही.
  •  देवाची उरूळी येथील ९ लाख टन कचर्‍यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून २० एकर क्षेत्र रिक्त करण्याची निविदा कशाच्या आधारे काढली याचे उत्तर पालिका अधिकार्‍यांकडे नाही.

पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीचा बाजार : शरद पवार यांचे टीकास्त्र

[amazon_link asins=’B0787YSTXN,B01N97RZ15′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c81adf09-ba34-11e8-a3c8-31d9cabf2b3c’]