महापालिकेच्या कर्मचाऱ्याची  मुजोरी… कचरा गोळा करण्यासाठी घेतात पैसे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील शहर आणि परिसरात स्वच्छता राखली जावी  याकारिता कचरा उचलण्यासाठी महापालिकेची घंटा गाडी दारोदारी फिरून कचरा गोळा  करण्याचे काम करते. पण महापालिकेतील मुंढवा केशवनगर परिसरात कचरा गोळा करण्याकरिता येणारा गाडीचा चालकच नागरिकांकडून पैसे गोळा करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर अशा भ्रष्ट कर्मचाऱ्याची बदली करण्यासाठीचा अर्ज महापालिकेचे हडपसर मुंढवा येथील सहाय्यक आयुक्तांनी  केला आहे.

हैद्राबादहून पुण्यात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इंजिनिअरला अटक

याबाबत मिळालेली  अधिक माहिती अशी की,  केशवनगर भागात कचरा उचलणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करणारे , शिवाजी शहाजी चव्हाण  एम एच १२ जे एफ ७९२ म न पा  गाडी क्रमांक १०२९ केशवनगर आरोग्य कोठी येथे काम करतात . हे चालक काम करण्यास चालढकल करतात . तसेच गाडी दुसऱ्या चालकाला चालवायला देतात अशा तक्रारी नागरिकांकडून  करण्यात आल्या आहेत आणि विशेष म्हणजे  नागरिकांकडून कचरा उचलण्यासाठी चव्हाण नागरिकांकडून पैसे मागतात. नागरिकांना शिवीगाळ करतात. हे प्रकरण इथेच थांबत नाही तर याबाबत विचारले असता वरिष्ठांशी उद्धटपणे वागतात. या सर्व कारणांमुळे २९ सप्टेंबर २०१८ रोजी चव्हाण यांना मेमो देण्यात आला आहे. असे असूनही चव्हाण यांनी अद्याप खुलासा केलेला नाही.  चव्हाण यांची बदली करून दुसरा चालक देण्याची मागणी करण्यात आली आहे.