Munmun Dhamecha On Sameer Wankhede | समीर वानखेडेवर मॉडेलचा गंभीर आरोप; म्हणाली – ‘त्यावेळी मी भीतीपोटी गप्प…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Munmun Dhamecha On Sameer Wankhede | ऑक्टोबर २०२१ मध्ये एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरण (Cordelia Cruise Ship Drug Case) चांगलेच गाजले होते. मात्र या प्रकरणामुळे आता ते अडचणीमध्ये येत आहे. आर्यन खान सोबत अटक केलेल्या मॉडल मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) हिने ही समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने एका इंग्रजी वेबसाईटशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने वानखेडे यांनी मॉडेल म्हणून तिला फसवल्याचा आरोप धामेचाने केला आहे. (Munmun Dhamecha On Sameer Wankhede)

क्रूझवर ड्रग्ज मिळाल्याचा आरोप असलेली मॉडेल मुनमुन धमेचा हिने नाकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रसिद्धीसाठी (Media Publicity) आपल्याला आपल्याला फसवल्याचे म्हटले आहे. मॉडेल मुनमुन धमेचा आणखी आरोप करत म्हणाल्या आहेत की, ड्रग्ज सापडले तिथे आणखी दोन व्यक्ती देखील उपस्थित होत्या. परंतु दोघांनाही सोडून देण्यात आले. मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी केवळ मुनमुन धमेचा चित्रपट सृष्टीशी (Bollywood) निगडीत असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी मी भीतीपोटी गप्प बसले होते. पण आता सीबीआयने (CBI) वानखेडेवर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा असल्याचे मॉडेल धमेचा यांनी सांगितले आहे. (Munmun Dhamecha On Sameer Wankhede )

धमेचा पुढे म्हणाली, “सुरुवातीला, वानखेडे यांनी मला सांगितले की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
याप्रकरणात माझ्याविरोधात काहीही दोषी आढळले नाही आणि मला जाण्यापूर्वी ते आवश्यक औपचारिकता ते
पूर्ण करतील. मात्र, नंतर मी मॉडेल असल्याचे समजताच त्यांनी मला अटक करण्याची कारवाई केली.
त्यानंतर, मला कोर्टात हजर करण्यात आले व या दरम्यान मला माझ्या कुटुंबीयांशीदेखील बोलूही दिले नाही.”

यांचबरोबर धमेचा म्हणाली की तिला तिचा वकील बदलण्यास भाग पाडले गेले व वानखेडे आणि त्यांच्या
टीमने शिफारस केलेल्या पैकीच एकाची निवड करण्यास भाग पाडले.

पहिल्या आठवड्यात, एनसीबीने मुनमुन धमेचासह आर्यन खान आणि इतरांना अमली पदार्थ (Drugs) बाळगणे,
सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. मुनमुन धमेचा आणि आर्यन खान यांना २८ ऑक्टोबर २०२१
रोजी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला होता. पुराव्याअभावी एनसीबीने (NCB)
मे २०२२ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावे नसली तरी एनसीबीने दाखल
केलेल्या आरोपपत्रात धमेचाचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले होते.

Web Title :  Munmun Dhamecha On Sameer Wankhede | cordelia cruise ship drug case involving model munmun dhamecha alleges on sameer wankhede

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्पसाईज…’, देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका; म्हणाले- ‘जे खरे बाळासाहेबांचे पाईक होते ते…’ (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात; तरुणासह तिघांवर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल