Muralidhar Mohol | पुण्यातील पावसावरुन मुरलीधर मोहोळ आणि अजित पवारांमध्ये जुंपली; विचारले धडाधड प्रश्न…

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – कालच्या पावसात पुणेकरांचे (Rain in Pune) अतोनात हाल झाले. अनेक घरांमधून पाणी शिरले तर रस्त्यांना नद्यांच्या स्वरूप आले होते. अनेक गाड्या वाहून गेल्या. चुकीच्या पद्धतीने विकास कामे करण्यात आल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आज राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ‘पुण्याच्या नव्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास रस्त्यावरुन वाहत आहे, असे खोचक वक्तव्य केले होते. यावर आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार आणि मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात आज ट्विटर वॉर सुरू असल्याचे दिसून आले.

 

पुण्यातील पावसात पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर अजित पवार यांनी महालिकेतील सत्ताधारी भाजपावर (BJP) ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला. पवार यांनी म्हटले की, स्मार्ट सिटीचे (Smart City) स्वप्न दाखवून भाजपने पुणे शहराचे पार वाटोळे करून ठेवले आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपाने (Pune Municipal Corporation (PMC)  पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

 

मनपाला ’अव्यवस्थेची’ कारणे काय आहेत ती सांगावीच लागतील. तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. जनतेने देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊले उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत, असे पवार यांनी म्हटले. या टिकेवर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी प्रत्युत्तर दिले.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधीपक्ष नेते अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार केला.
यात म्हटले की, बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, आंबील ओढा (Ambil Odha) दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण?,
पीएमपीएमएल (PMPML) का खिळखिळी झाली?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला?,
मेट्रो (Pune Metro) दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली?, कचर्‍याची समस्या का झाली?, बीआरटी बळींचे पाप कोणाचे?

 

दरम्यान, आज सकाळी प्रथम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील स्थितीची दखल घेत महालिकेतील सत्ताधारी भाजपाला सुनावले.
पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काही व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील जोडली होती.
त्यांनी म्हटले की, पुण्याच्या नव्या शिल्पकारांनी पाच वर्षे पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरुन वाहत आहे.
गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्यांचे काम पाण्यातून वाहत आहे.

 

Web Title :- Muralidhar Mohol | twitter war between muralidhar mohol and ajit pawar over rain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane | भास्कर जाधव शिंदे सरकारमध्ये येण्यासाठी खटाटोप करीत होते, नितेश राणेंचा खळबळजनक दावा, वैभव नाईकांवरही केला आरोप

Chitra Wagh | भास्कर जाधवांवर टीका करताना चित्रा वाघ यांची जीभ घसरली; ‘नाच्या’ उल्लेख करत म्हणाल्या…

MLA Vaibhav Naik | आमदार वैभव नाईक नितेश राणेंच्या विरोधात आक्रमक, म्हणाले- ‘आता नितेश राणेला धडा शिकवण्याची वेळ आली’