मुरबाड ! अचानकपणे कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असल्याने मुरबाड तालुका हादरून गेला असून मुरबाड शहारा सह तालुक्यातील खेडो पाड्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक भयबीत झाले आहेत एकेकाळी कोरोना मुक्त असलेला मुरबाड तालुका अचानक कोरोनाचे रुग्ण भेटत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुरबाड शहरा सह काही गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे तर मुरबाड पोलीस वसाहती मध्ये एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने पोलीस वसाहती पासून एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आला आहे मुरबाड नगर पंचायतीच्या पत्रा नुसार हा आदेश काढण्यात आला या क्षेत्रात शहरातील मुख्य बाजार पेठेचा समावेश असल्याने औषधाची दुकाने वगळता शहरातील सर्व दुकाने 10 जुलै पर्यंत बंद करण्याचा आदेश उप. विभागीय अधिकारी नितीन महाजन यांनी काढला आहे.

मुरबाड तालुक्यात आणखी तीन कोरोना बाधित झाले आहेत त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या, 32 झाली आहे या मध्ये तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांनचा समावेश असून एकुण रुग्ण संख्या – ३२, आजचे नवीन रुग्ण – ०३, उपचार सुरू असलेले- २४, बरे झालेले रुग्ण- ०७, मृत्यू झालेले- ०१, होम क्वारंटाईन- १२० असून आजचे नवीन रुग्ण माल्हेड १, नारीवली १, सायले १ आहेत रुग्णाचे वाढते प्रणाम पाहता, मास्क, सॅनिटायझर, अत्यावश्यक काम निमित्तानेच भाहेर पडावे.

मुरबाड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढील आठवड्यात मुरबाड ग्रामीण रुग्णालया जवळ नवीन कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.