‘कोरोना’शी लढा देण्यासाठी 100 नागरिकांनी केलं रक्तदान

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी ब्लड डोनेट चा कॅम्प घेत मुरबाड जिंकणार कोरोना हारणार अशी स्लोगण दिले व त्या उक्ती प्रमाणे 100 बाटल्या रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरबाड पंचायत समितीने आज दि.26 मार्च 2020 रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमावली चे पालन करण्यात आले रक्तदानाचे आयोजन मुरबाड पंचायत समिती यथे विशेष काळजी घेत सेनेटायजर,फवारणी करून रक्त दात्यानं मध्ये अंतर ठेऊन रक्तदान शिबिर पार पडले.

देशात कर्फ्यु लागू असतांना ही कोरोना रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची गरज पाहून मुरबाड पंचायत समिती च्या या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला सकाळी 10:00 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत. या शिबिरात मुरबाड तालुक्यातील रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी मुरबाड चे आमदार किसन कथोरे, तहसीलदार अमोल कदम पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, मुरबाड नगरपंचायत मुख्यधिकारी परितोष कंकाळ, तालुका वैद्यकीय अधिकार श्रीधर बनसोडे, नगराध्यक्षा छाया चौधरी, पंचायत समिती गट नेते श्रीकांत धुमाळ, पंचायत समिती सदस्य, सीमा घरत, ग्रामसेवक, अनिल घरत तसेच चेतनसिह पवार काँग्रेस प्रदेश सरचिटणीस,श्रीकांत धुमाळ प स सदस्य,डॉ विश्वनाथ पवार,तुकाराम जंगम प स मुरबाड शाखा अभियंता, पत्रकार अरुण ठाकरे,नरेश विषे सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड सदस्य यान सह मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित होते तर रक्तदान शिबिराचे आयोजक गटविकास अधिकारी यांनी केले.

कोरोना ग्रस्तांना रक्तदान करणाऱ्या रक्तदात्या चे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीची कै, वामनराव ओक रक्तपेढी ठाणे यांचे आभार गटविकास अधिकारी केळकर यांनी मानले तर प्रत्येक रक्त दात्याच्या चेहऱ्यावर आपना कडूनही सेवा घडत असल्याचे हावभाव दिसून आले तर मुरबाड मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणार असल्याचे रिपोर्टर अरुण ठाकरे यांच्याशी बोलताना गटविकास अधिकारी केळकर यांनी सांगितले या वेळी एकीकडे रक्तदान शिबिर चालू असताना बाजार पेठ हायवे मुख्य नाक्यावर उन्हातान्हाची कोणतीही पर्वान करता पोलीस अधिकारी आपली कर्तव्य पाडत होते

You might also like