शहिदांना श्रद्धांजली ! संविधान दिन साजरा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर तर्फे मुरबाड शहरातील छ. शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्य सैनिक स्मारक येथे संविधान प्रस्तावनेचे वाचन आणि २६/११ च्या शाहिदांना आदरांजली अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मुरबाड मधील नारीवली ग्रामपंचायतमध्येही संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी संविधानाचे वाचन अहिरे सरांनी केले. या वेळी उपसरपंच मंजुषा बांगर, सदस्य योगेश भोईर, रमेश शिंदे, निलेश भोईर, दर्शना चौधरी उपस्थित होते ७० व्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त संविधानाचे पूजन करून सामूहिकरित्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. तसेच २६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली.
Murbad
यावेळी रिपाईं सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने, पंचायत समिती सदस्य अनिल देसले, मुरबाड पोलीस स्टेशनचे बोराटे, प्रा. अरविंद विशे सर, फडकी मासिकचे कार्यकारी संपादक प्रा. संजय इधे सर, संघटित युवा मंच अध्यक्ष ऍड. मदन थोरात, माजी सरपंच अरुण पष्टे, भारतीय बौद्धमहासभा मुरबाड तालुका सह अनेक मान्यवर, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

तर या कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, युवकाध्यक्ष राजेश गायकवाड, शहराध्यक्ष अविनाश जाधव, निखिल अहिरे, सचिन धनगर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गायकवाड यांनी केला.

Visit : Policenama.com