Murbad Crime | वार्तांकन करताना पत्रकारास शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; तालुक्यातील पत्रकारांनी दिला उपोषणाचा इशारा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन – Murbad Crime | मुरबाड तालुक्यात (Murbad Taluka) एक महिन्या पासून सेवा सहकारी सोसायटी निवडणूक (Seva Sahakari Society Election) सुरु आहे. यावेळी वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारास (Journalist) वार्तांकन करण्यास अडथळा करून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. ही घटना मुरबाड तालुक्यातील (Murbad Crime) नारीवली येथे घडला आहे.

 

नारीवली येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक रविवारी (दि.20) पार पडली. या निवडणुकीचे वार्तांकन करण्यास गेलेले पत्रकार अरुण ठाकरे (Journalist Arun Thackeray) यांना निवडणूक आचारसंहिता (Code of Conduct) भंग करणारा बॅनर आढळला. त्यानंतर ठाकरे हे त्याठिकाणी फोटो काढत असताना त्यांना भाजपाचे (BJP) ठाणे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर (Thane Zilla Parishad Member Ulhas Bangar) व त्यांचा मुलगा तेजस उल्हास बांगर (Tejas Ulhas Bangar) तसेच जिल्हा परिषद शिक्षक रामचंद्र भोईर (Ramchandra Bhoir) हे ठाकरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी ठाकरे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ (Abusive) करून जीवे मारण्याची धमकी दिली. ईथुन निघून जा अन्यथा विपरीत घडेल अशी धमकी दिली. तसेच तालुक्यातील पत्रकारांना उद्देशून पत्रकार काय आहेत त्यांची लायकी काय आहे असे वक्तव्य करून दमदाटी केली. (Murbad Crime)

 

लोकशाहीचा (Democracy) चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार हे लोकांसमोर खरे रूप आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु असे काही बांडगुळ पत्रकारांना वार्तांकन करत असताना धमकी देत असतील तर लोकशाही टिकेल का? असा प्रश्न पडला आहे. या घटने विषयी मुरबाड पोलीस ठाण्यात (Murbad Police Station) पत्रकार ठाकरे यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पत्रकारांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी दिले. या घटनेबाबत मुरबाड मधील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक पांढरे (Police Inspector Pandhare) यांची भेट घेऊन ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

एक वर्ष होऊन गेलेल्या ग्रामपंचायत निवडणूकवेळी सुध्दा जिल्हा परिषद शिक्षक रामचंद्र मारुती भोईर यांनी
मतदान चालू असताना गावकऱ्यांवर वीट उचलून शिवीगाळ करत आचार संहितेचा भंग केला.
यावेळी जी. प. शिक्षक शरद रामचंद्र चौधरी, शासकीय आश्रम शाळा भालचंद्र तानाजी भोईर यांनी
या संदर्भात तक्रारी अर्ज केला असून या प्रकारावरून जी. प. शिक्षक शासनाच्या नियमाची पायमल्ली करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच डोळेझाक करत असलेल्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी (Inquiry) करून त्यांच्यावर कठोर कारवाही करावी.
अन्यथा मुरबाड तालुक्यातील सर्व पत्रकार आमरण उपोषण (Hunger Strike) करणार असल्याचे जाहीर केले.
तसे पाठिंब्याचे पत्र ही दिले आहे. याची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कारवाई करावी.

 

 

Web Title :- Murbad Crime | Abusing a journalist while reporting, threatening to kill; Journalists in the taluka warned of a hunger strike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘…म्हणून भावना गवळी शिवसेनेच्या संपर्क अभियानाला गैरहजर’ – संजय राऊत

 

Ileana D’cruz Wear Transparent Bikini | पारदर्शक ब्रालेट घालून समुद्र किनारी झोपली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून चाहते झाले थक्क

 

Pune Crime | पुण्यात बेकायदेशीर गावठी दारुची विक्री करणारा गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 61 जणांवर कारवाई

 

Solapur Police | मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ सोलापूरात ? पोलिसांचे वसुलीचे टार्गेट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाल्याचा RTI कार्यकर्त्याचा दावा; पोलिसांनी आरोप फेटाळले (व्हिडिओ)