मुरबाड शहरात चोरी – घरफोडीच्या घटना वाढल्या, पोलिसांसमोर चोरट्यांना गजाआड करण्याचे ‘आव्हान’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन  – मुरबाड शहरात चोरीच्या व घरफोडीच्या घटना थांबताना दिसत नाही. काल रात्री तोंडलीकरनगर येथे राहणारे शरद कंटे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. गुरूदत्त कृपा नावाची इमारत हि शरद कंटे यांच्या मालकीची आहे. या ठिकाणी खालच्या रूम मधे स्वःता राहतात व वरचे दोन रूम भाड्याने दिले आहेत .काल रात्री या तिन्ही रूम मधे कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन घराचे सेफ्टी डोअर तोडून घरांमध्ये प्रवेश केला. शरद कंटे यांच्या घरातील रोख रक्कम व सोन्याचा हार लंपास केला तर त्यांचे भाडोत्री यांच्या घरातील सोन्याची चेन, ब्रेसलेट व अंगठ्या असा तीन ते चार तोळे सोने लंपास केले.

चोरट्यांनी सी.सी.टीव्ही कॅमेरे फोडले व मशीनसुद्धा घेऊन गेले. या घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार राम शिंदे यांनी केला असून चोरट्यांचा तपास मुरबाड पोलीस करत आहेत. आशा चोरीच्या घटनेचा क्रम चालूच असून मुरबाड कर चोरांच्या भीतीने भयभीत झाले आहेत. एवढ्यावरच या घटना थांबल्या नसून गाड्यांचे टायर, गाड्या, पेट्रोल चोरने या यासारख्या अनेक घटना घडत आहेत या चोरांनी मुरबाड पोलिसांन समोर आव्हान केले आहे.

मुरबाड सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये जुगार, मटका यांना मोठ्या प्रमाणात पेव फुटला आहे. मुरबाड पोलिसांचा वाचक गुन्हेगारांवर राहिला नसून मुरबाड शहरात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त घालण्याची मागणी मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश देसले यांनी केली.

Visit : policenama.com