मुरबाड : निकृष्ठ कामाची चौकशी करण्याची खासदारांनी केली लोकसभेत मागणी

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात याञेसाठी प्रसिध्द असलेल्या म्हसा गावाला देशपातळीवर स्थान मिळवुन देण्याचा संकल्प केलेल्या आमदार किसन कथोरे व खासदार कपिल यांच्या कार्याला खोडा घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागानंतर रस्ते विकास महामंडळाने देखील केल्याने कोट्यावधी रुपये खर्च करुन मुरबाड म्हसा या रस्त्याला खड्डे आणि भ्रष्टाचाराच्या साडेसातीने ग्रासले असल्याने यातून कायम सुटका व्हावी यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हसोबाला साकडे घातले आहे.

108 कोटीचा काँक्रीट रस्त्यावर भ्रष्टाचाराचे खड्डे पडल्याने हे काम त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी भिवंडी लोकसभेचे खासदार व या रस्त्याचे शिल्पकार खासदार कपिल पाटील यांनी अधिवेशन काळात शून्य प्रहरात प्रश्न उपस्थीत केल्याने ठेकेदाराचे व एमएमआरडीसी च्या अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्रातील प्रसिध्द अशा म्हसा याञेला शेजारील राज्यातील देखील हजारो भाविक येतात . घोंगडी, मिठाई आणि बैल खरेदी विक्रीसाठी प्रसीध्द असलेली ही याञा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते. पंधरा दिवस चालणा-या याञेत कोट्यावधींची उलाढाल, हजारो वाहनांची वर्दळ. परंतू कच्चे रस्ते व धुळीचे साम्राज्य हे नित्याचेच झाल्याने यातून कायमची सुटका करण्याचा संकल्प 2009 साली मुरबाड मतदार संघातून निवडूण आलेले आमदार किसन कथोरे यांनी करुन मुरबाड म्हसा रस्ता सुसज्ज करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या.

रस्त्याचा काही भाग वनविभाच्या जागेतून जात असल्याने व दुतर्फा शेकडो झाडांची कत्तल होणार असल्याने लागणा-या सर्व परवानग्यासह, बारा किमी साठी 108 कोटी रुपये निधी एमएमआरडीसी विभागाला खासदार कपिल पाटील व आ . किसन कथोरे यांनी मिळवुन दिला. परंतू कायम निकृष्ठ कामे करुन भ्रष्टाचाराच्या गर्तेत राहीलेल्या या विभागाने रस्त्याचे अर काम अतिशय खराब केल्याने जागोजागी काँक्रीटला मोठं मोठे खड्डे, ठिक ठिकाणी चीरा गेल्याने अनेक अपघात एका मागून एक घडत आहेत.

याची माहीती खासदार पाटील यांना मिळताच त्यांनी लोकसभेच्या अधिवेशनात लोकसभाअध्यक्ष्याकडे शून्य प्रहरात उपस्थीत करुन एमएसआरडीसी कडून हे काम काढून घेण्याची मागणी केली . व ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची मागणी केली. या रस्त्याचा ठेका पिएसके इंन्फ्रा या कंपनीला मिळाला असल्याचे समजते वे काम त्यांनी आकरा टक्के दराने जिजाऊ कंट्रक्शनला दिले असल्याचे समजते. त्यामुळे तोट्यात जाणारा ठेका फायद्यात आणण्यासाठी ठेकेदाराने सुमार दर्जाचे केल्याचे दिसून येत असून हे काम त्वरीत बंद करावे अशी मागणी मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य श्याम राऊत यांनी देखील कार्यकारी अभियंता खिस्ते यांच्याकडे केलेली आहे. तर एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता खीस्ते यांनी उपअभियंते गायकवाड यांनी पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like