ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

मुरबाड : अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळं नागरिकांना पत्करावा लागतोय उपोषणाचा मार्ग

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन – मुरबाड मध्ये अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मुळे नागरिकांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असून कोव्हिडं आणि अवकाळी पावसाने बळीराजाला अक्षरशः पिळून काढले आहे या मध्येच वेळेत पंचनामे न करणे,कर्ज माफी न होणे,अव्वाच्या सव्वा भावाने बी बियाणे,खताची विक्री याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना शासनाने काढलेला भात खरेदी केंद्र सुरू करावी या संदर्भात 27 फेब्रुवारी रोजी काढलेला जीआर फाट्यावर मारून आज दि.2 नोव्हेंबर पर्यंत अमलात न अनुन शेतकऱ्यांना वेठीस जाणीवपूर्वक धरनाऱ्या शासनाच्या निषेधार्थ आज मुरबाड मध्ये स्वराज्य भातापिक संघटनेच्या पधातीकाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले

या उपोशनास संघटनेचे अध्यक्ष रमेश हिंदुराव, उपाध्यक्ष दत्तात्रय पतंगराव,सचिव नेताची घुडे,विठ्ठल गडगे, बाळू हरड,विष्णु चौधरी यान सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते तर या उपोषणास आर पी आय सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने,प्रहार संघटना अध्यक्ष शरद पाटील यांनी उपस्थिती दाखविली

मुरबाड तहसील कार्यालया समोर होत असलेल्या या उपोषण वेळी शेतकरी आणि पद्धधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा बाजी करत शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला या वेळी खरेदी विक्री संघात सीसीटीव्ही कॅमेरे,शेतकऱ्यांना प्रती क्विंटल चार हजार हमीभाव,त्वरित भातखरेदी केंद्र चालू अश्या विविध मागण्या घेऊन उपोष्ण सुरू असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे

Back to top button