कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल सुरू असल्याच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालय पडलं ‘ओस’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) – केंद्र शासनाकडून कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल सुरू असल्याच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात कामगार वर्ग आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी असल्याने मुरबाड मधील कामगार वर्गाने तीव्र घोषणाबाजी केली तर शासकीय कार्यालये ओस पडली होती.

केंद्र सरकार कडून कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल सुरू असल्याच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांनी आज बंद पुकारला होता. या संपाचे पडसाद मुरबाड मध्ये ही मोठ्या प्रमाणात उमटले. येथील कामगारांनी आज केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा घोषणाबाजी करीत तीव्र निषेध करून आपला संताप व्यक्त केला.

तर मुरबाड मधील तहसीलदार कार्यालय आज ओस पडले होते. येथील राज्यस्तरीय महसूल कर्मचारी संघटना संलग्न असलेल्या मुरबाड तालुका महसूल कर्मचारी संघटनेने संपात उडी घेतल्याने तहसीलदार कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प होते. तर पंचायत समिती कार्यालयात ही काही कर्मचारी संपावर आसल्याचे सांगण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/