Murbad News | मानसी 50 लिटर पाणी देण्याचा नारीवली ग्रामपंचायतीचा ‘मानस’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – Murbad News | मुरबाड तालुक्यात (Murbad News) ग्रामपंचायत सभा सुरू झाल्या आहेत. कोविड काळात मागील तीन वर्षामध्ये पहिलीच सभा नारीवली ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यावेळी पंचायत समिती माजी सभापती उल्हास बांगर (Ulhas Bangar), ग्रामसेवक गोरले, सरपंच देवयानी भोईर (Sarpanch Devyani Bhoir), उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

 

गावाचा विकास करत असतांना सगळे वाद विवाद बाजूला ठेऊन विकास साधला पाहिजे. गावासाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांची माहिती सांगून गावासाठी गावकऱ्यांनी गावच्या विकासाकरीता पुढे आले पाहिजे, असे उल्हास बांगर यांनी सांगितले. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची (drinking water) व्यवस्था केली पाहिजे. यासाठी केंद्र सरकार (Central Government), राज्य सरकारच्या (State Government) माध्यमातून योजना राबवून प्रत्येक मानसी पन्नास लिटर पाणी मिळाले पाहिजे. यासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा करून मार्ग कसा निघेल यावर माजी सभापती उल्हास बांगर यांनी मार्गदर्शन (Murbad News) केले.

 

ग्रामसेवक गोरले यांनी सभेस 42 ग्रामस्थ असल्याने ग्रामसभा तहकूब केली.
मात्र मागील 2 वर्षात ग्रामसभा झाली नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.
त्यामुळे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या उपस्थित ग्रमसभा झाली पाहिजे असा आग्रह ग्रामस्थांनी केला.
यावेळी कृषी सहाय्यक गवई यांनी उपस्थित गावकऱ्यांना कृषी विभागाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
ऑनलाईन ई-पिक पाहणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केली पाहिजे. एका मोबाईल मधून पन्नास शेतकऱ्यांची नोंद होऊ शकते.
शेतकऱ्यांनी फळबाग करून आपल्या उत्पादनमध्ये वाढ होईल अशा अनेक योजनांची माहिती दिली.
उपसरपंच कल्पेश सोलसे (Kalpesh Solse) यांनी कोरम अभावी सभा तहकूब झाल्याचे जाहीर (Murbad News) केले.

Web Title :- Murbad News | Narivali Gram Panchayat plan 50 liters water per head

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation GB | नधिकृत केबल शोधण्यापूर्वी केबल कंपन्यांना नोटीस पाठवून ‘डिक्लेरेशन’ मागवणार – महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला