भुकेल्या माकडांचे चेहरे पाहूनच त्याचं प्राण्यांवरील प्रेम झालं जागृत

मुरबाड: पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन लागल्या पासून माळशेज घाटातीळ मालवाहतूक,ट्रॅव्हल्स बरोबर मोठया प्रमाणात रहदारी बंद झाल्याने एन वेळी वन्य प्राण्यांना वर उपासमारीची वेळ अली असून अत्यावश्यक सेवा भाजीपाला माळ वाहतूक करणारे पंढरी शेळके यांनी वन्य प्राण्यांना अन्न,फळे खाऊ घालून मुक्या प्राण्याचा देवदूत बनला आहे घाट माथ्यावरील नियमित प्रवासी,ट्रॅव्हल,मालवाहतूक यान वर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांनाही भूकमारीचा सामना करावा लागतोय.मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटा मध्ये पर्यटकांचे विशेष आकर्षण असनाऱ्या माकडांची सध्या मोठी उपासमार होत आहे. त्या मुळे या माकडांनी अन्नाच्या शोधात आता गावांकडे मोर्चा वळवला आहे.

लॉकडाऊन मुळे पूर्णतः ठप्प झालेल्या मुरबाड-माळशेजघाट-नगर हा महामार्ग माळशेज घाटातुन जातोय त्या मुळे घाटात मुक्तपणे वावरणाऱ्या माकडांना प्रवाशी व पर्यटक खाण्यासाठी देत होते. मात्र हा रस्ताच बंद असल्याने माणसाळलेल्या माकडांची मोठया प्रमाणात उपासमार सुरू आहे. मात्र या माकडांसाठी एक पंढरीनाथ नावाचा तरुण अन्नदाता ठरलाय जुन्नरहुन मुरबाडला अत्यावश्यक सेवेत भाजीपाला नेणाऱ्या पंढरीनाथ शेळके याला भुकेले चेहरे दिसताच त्याचे प्राण्यांवरील प्रेम जागृत झाले अन पंढरीने दररोज या माकडांना खाऊ,फळे नित्यनेमाने आपली परिक्रमा चालू ठेवत पंढरी पुढच्या मार्गाला लागतोय.