108 कोटीचा काँक्रीट रस्ता खड्ड्यात, ठेकेदार एजन्सीवर कारवाईची मागणी

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड म्हसा कर्जत रस्त्याला खड्डे आणि भ्रष्टाचाराचे लागलेल ग्रहण सुटण्याचे नाव काही घेत नाही. कायम खड्डेमय असलेला रस्ता सुस्थीतीत आणण्यासाठी चार वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने बारा कि.मी. साठी मंजूर केलेले पन्नास कोटी रुपये अर्धवट कामावर खर्च करुन तत्कालीन शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ व उपअभियंता यांनी ठेकेदाराला बील काढून देण्यास मदत केली. आणि हाच रस्ता पुन्हा महाराष्ट्र रस्ते विकास विभागाकडे वर्ग केला. या विभागाने जवळपास एकशे आठ कोटी मंजूर केले असून संपूर्ण रस्ता आरसीसी पध्दतीने करण्यात येत आहे.

परंतू हे काम काँक्रीटचे आहे की नाममाञ सिमेंट आणि दगडपावडर खडीचा आहे असेच दिसून येत संपूर्ण रस्त्यात भेगा आणि खड्डे पडले आहेत. हा रस्ता अतिशय सुमार दर्जाचा झालेला असून फक्त चार वर्षे ठेकेदार या रस्त्यावर देखभाल करणार असून आताच हा रस्ता निकृष्ठ झालेला आहे. तर चार वर्षा नंतर याची जबाबदारी शासनाने का घ्यावी अशी विचारणा माजी पंचायत समिती सदस्य श्याम राऊत यांनी केली असून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शहापूर मुरबाड कर्जत राज्य मार्गावर म्हसा गाव येत असून या ठिकाणी पौष पौर्णिमेला महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली म्हसोबाची याञा भरली जाते. पंधरा दिवस चालणा-या याञेला लाखो भाविक भेट देत असतात . याञेनिमीत्ताने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. दरवर्षी रस्ता खड्डेमय व धुळीचे साम्राज्य तयार होत असल्याने, चार वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पन्नास कोटी रुपये मंजूर करुन काम सुरु केले. अर्धवट काम असतांनाच हा रस्ता एमएसआरडीसी कडे वर्ग केला. परंतू मंजूर असलेली संपूर्ण रक्कम खर्च दाखवली. पुढे 2018 साली या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन तो एमएसआरडीसीकडे वर्ग करून एकशे आठ कोटी रुपये बारा किमी साठी तरतुद केली. या रस्त्याचे एकूण अंदाजपञक आठशे पन्नास कोटी असून, शहापूर मुरबाड ते कर्जत पर्यंत हा रस्ता तयार होणार आहे.

परंतू मुरबाड ते म्हसा पर्यंत बारा किमी चा एकशे आठ कोटीचा सुरु असलेला रस्ता जर निकृष्ठ झाला असून अनेक ठिकाणी खड्डे व भेगा पडलेल्या आहेत. या आगोदर देखील निकष्ठ भाग काढून टाकण्याची वेळ ठेकेदारवर आली होती. हे काम पीएसके इंन्फ्रा प्रा. लि. या संस्थेच्या नावावर मंजूर असून उप ठेकेदार म्हणून जिजाऊ कंट्रक्शन करीत आहे . जिजाऊ कंट्रक्शनचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी नुकतेच वाडा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्या संदर्भात अंदोलन केले होते . माञ त्यांच्या संस्थे कडून होत असलेले निकृष्ठ काम त्यांना दिसत नाही का असा अरोप करत श्याम राऊत यांनी केला असून चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे .

शहापूर मुरबाड कर्जत हा रस्ता पीएसके इंन्फ्रा प्रा. लि. कंपनी च्या नावावर असून पोट ठेकेदार जिजाऊ कंट्रक्शशन हे काम करीत आहे. या रस्त्या सबंधी माहिती घेऊन रस्ता दुरुस्त केला जाईल. खिस्ते कार्यकारी अभियंता एमएसआरडीसी बांद्रा, मुंबई
सदरच्या रस्त्यावर कशा पध्दतीचे तडे पडले आहेत. त्याची पाहणी करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच चार वर्षे ठेकेदाराने या रस्त्यावर देखभाल दुरुस्ती करायची आहे. गायकवाड उपअभियंता आरटीडी. बांद्रा मुंबई
खड्डे व तडे गेलेला भाग काढून टाकला जाईल. डी जी होले. जीजाऊ कंट्रक्शशन