मुरबाड : शासकीय ग्रामीण रुग्णालयाबाहेर लागल्या लांबच लांब रांगा

मुरबाड  : पोलीसनामा ऑनलाइन  –   सरकारने विविध राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना काही बंधने घालून आपपल्या राज्यात जाण्याची सूट दिल्याने आज आरोग्य तपासणीसाठी इच्छुक स्थलांतरीत नागरिकांची मुरबाडच्या शासकीय रुग्णालया बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन’मुळे मुरबाड चा कामगार वर्ग घरात बंदिस्त झाला आहे यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांचा समावेश आहे मात्र सध्या स्थितीला हाताला कोणत्याही स्वरूपाचे काम नसल्याने तसेच जवळ असलेली जमापुंजी संपुष्टात आल्याने या कामगार वर्गाच्या कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे यांना आपल्या घरी परतल्या शिवाय गत्यंतर नाही तर या कामगारांची तळमळ पाहून सरकारने त्यांना घरी जाण्याची मुभा दिली असून विविध तीन पैकी महत्त्वाचे अ अ त अर्थात आरोग्य चाचणी दाखला आवश्यक असल्याने आज सकाळपासून मुरबाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाबाहेर या परप्रांतीय नागरिकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या
तर मेडिकल सर्टिफिकेट साठी ताटकळत उभ्या असलेल्या या नागरिकांना सोशल डिस्टन्स भान ही राहिला नव्हता तथा याबाबत सूचना करण्यासाठी कोणताही अधिकारी कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित नव्हता त्यामुळे मात्र या नागरिकांना आपल्या मातृभूमी कडे परतण्यासाठी अद्याप किती खस्ता खाव्या लागतील हा प्रश्न निर्माण झाला आहे