मुरबाड आगार बनलंय मृत्यूचा सापळा ?

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड तालुक्यात एस. टी. महामंडळच्या बस अपघाताची मालिका सुरूच असून आज बस आगारातच बस खाली चिरडून पन्नाशीतल्या एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून एसटी महामंडळाचा तीव्र निषेध केला.

मुरबाड तालुक्यातील विढे गावातील रहिवासी असणारे व सध्या उल्हासनगर येथे राहणारे सुदाम भालेराव हे मुरबाड बस आगारात चालत होते. त्याचवेळी शहापूरवरून मुरबाड आगारात प्रवेश करणारी एम. एच. २० बी. एल. ०९८६ क्रमांकाची एस. टी. बस भरधाव वेगाने भालेराव यांच्या अंगावर गेली. यावेळी बस खाली चिडून भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. मयत हे मुंबई महानगरपालिका मध्ये सेवेत होते. या घटनेमुळे बस आगारात संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला.

ST bus

मुरबाड बस अपघातांच्या मध्ये अनेक नाहक बळी गेले आहेत. मुरबाड बस स्थानकामध्ये बस फिरवताना मागे पुढे न पाहता वेगात गाडी फिरवणे, लावणे, आगरामध्ये गाडी टाकताना गाडीचा वेग कमी न करणे नशा करून गाडी चालवणे असा मनमानी कारभार आणि आगारचा कोणताही नियंत्रण नसल्या कारणाने अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे .त्यातच आज बस आगारात बसच्या पुढच्या चाकाखाली एका प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याने प्रवाशी व नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. या वेळी बस आगारात नागरिकांचा प्रचंड उद्रेक झाला बस व्यवस्थापनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी करीत रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले.

मुरबाड बस आगार प्रवेश द्वारा समोर गतिरोधक, वाचमन, आगारात येताना जाताना गाडी सावकाश प्रवाशी पाहून चालवणे दक्षता घेणे गरजेचे असताना सुध्दा मुरबाड आगार दुर्लक्ष करीत असल्याचे उघड झाले आहे. ज्या एसटी ड्रायव्हर कडून अपघात झाले त्या ड्रायव्हरला कायम स्वरूपी संस्पेड करावे तर आगारा प्रवेश द्वारा समोर गतिरोधक टाकावा, वाचमन व्यवस्था करावी बस आगारात गाडी येताना जाताना सावकाश चालवावी अशा मागण्या प्रवाशांनी केल्या.

Visit : policenama.com