‘त्यांनी’ गतिमंद मुलांना दिली मायेची चादर

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – आपण समाजाचं काही तरी देणं लागतो. आपल्याकडून गोरगरीब, बेसहारा, अपंग, मतीमंद लोकांना एक मदतीचा हात असावा या उदात्त भावनेतून टिटवाळा येथील दोन तरुणांनी समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. त्यांनी आज मुरबाड येथील ‘अवनी’ मतीमंद मुलांच्या निवासी विद्यालयात जाऊन जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.

मुरबाड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात असणाऱ्या अवनी मतीमंद मुलांच्या निवासी विद्यालयात अनेक बेसहारा मतीमंद मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांना थंडीच्या दिवसांत थंडी पासून बचाव होण्यासाठी टिटवाळा येथील महेश एगडे आणि अमोल पाटील मुरबाड येथील विनोद मोरे या तरुणांनी गरम चादरीचे वाटप करून एक मायेची ऊब दिली.

या सोबत मतीमंद मुलांना भेडसावणाऱ्या समस्या आणी इतर प्रश्न तेथील शिक्षकांकडून या तरुणांनी जाणून घेतले. त्याचबरोबर या मतीमंद मुलांना कधीही कोणत्या प्रकारची मदत लागत असेल ते सांगा ती पूर्ण करण्यात येईल असा विश्वास महेश एगडे व अमोल पाटील यांनी दिला. गरम चादरी सोबत या अनाथ मुलांना खाऊ व शैक्षणिक वस्तूंचेही वाटप या वेळी करण्यात आले.

या वेळी मतीमंद मुलांच्या सोबत काही वेळ या तरुणांनी घालवला. त्यांच्या सोबत खेळून त्यांना आनंदीत केले. ही मुलं खरंच खूप हुशार असल्याचे मुलांसोबत गप्पा मारताना त्यांना जाणवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com